मुंबई, 26 मे : Coronavirus चा जगभारत प्रादुर्भाव वाढल्यानंतर जगण्याची सगळी रीतच बदलून गेल्यासारखी वाटते आहे. बाहेर एकत्र फिरण्यावर बंदी, पार्टी करता येत नाही, चित्रपटगृह बंद, रेस्टॉरंट्स बंद, मॉलमध्ये अंधार, उद्यानं आणि सार्वजनिक ठिकाणं सगळंच बंद. आता जेव्हा केव्हा या गोष्टी एकेक करून सुरू होतील, त्यावेळी तिथे जाणं तुम्हाला पूर्वीइतकं सुरक्षित वाटेल का? पहिल्यांदा चित्रपट पाहायाल आपण कधी बाहेर पडू शकू माहीत नाही.लॉकडाऊननंतरचा पहिला विमान प्रवास करून आलेल्या आमच्या रिपोर्टरने तो सगळा अनुभव खूप विचित्र असल्याचं म्हटलं आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संरक्षित आवरणात झाकलेला केबिक क्रू आणि सामानापेक्षा फेस शील्ड, मास्क आणि ग्लोव्हची चिंता करणारे प्रवासी असा एकूण धाकधुकीचा मामला होता तो.कोरोनानंतरचं जग वेगळं असेल असं आपल्या पंतप्रधानांपासून प्रत्येक जण म्हणतो आहे. वेगळं असेल म्हणजे नेमकं काय बदलेल? हे जाणून घेण्यासाठी News18 ने एक ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केलं आहे. तुम्हीही यात सहभागी होऊ शकता. फक्त या 5 प्रश्नांची उत्तरं द्या. कोरोना लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.