Home /News /coronavirus-latest-news /

भारतात Lockdown आवश्यक आहे का? WHO चं महत्त्वाचं विधान, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

भारतात Lockdown आवश्यक आहे का? WHO चं महत्त्वाचं विधान, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

Coronavirus Lockdown: देशात पुन्हा लॉकडाउन जाहीर करायचा का? याबाबतही चाचपणी सुरू आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लॉकडाउनबाबत मोठं विधान केलं आहे.

    नवी दिल्ली, 07 एप्रिल: सध्या भारतात कोरोना स्थिती (Corona Pandemic) भयावह बनत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona 2nd Wave) अनेक लोकांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. तसेचं कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही (Corona patients deaths) वाढलं आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट भारतासाठी चितेंचा विषय ठरत आहे. अशातचं देशांत अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात कडक निर्बंध लादले जात आहेत. तसेच देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करायचा का? याबाबतही चाचपणी सुरू आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लॉकडाउनबाबत मोठं विधान केलं आहे. WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी लॉकडाऊनचे भयंकर परिणाम नागरिकांना भोगावे लागतील, असं म्हटलं आहे. त्यांनी देशातील दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लसीकरण देण्यात यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्स्प्रेस' शी बोलताना डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, 'पुरेशा लोकांना लस देईपर्यंत आपल्याला दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागू शकतो. या साथीच्या आजारात आणखीही बऱ्याच लाटा असू शकतात.' त्याचबरोबर  डब्ल्यूएचओनं कोविशिल्ड लशीच्या दोन डोस दरम्यान 8 ते 12 आठवड्यांच्या कालावधी ठेवण्याची शिफारस केली आहे. यावर स्वामीनाथन म्हणाल्या की, 'सध्या लहान मुलांना लस देण्याची सल्ला देण्यात आला नाही. पण दोन डोसमधील कालावधी 8 ते 12 आठवड्यांपर्यंत वाढवता येऊ शकतो.' (हे वाचा-भारतात येऊन धडकतेय कोरोनाची दुसरी लाट, Sanjeevani Campaign ठरेल देशहिताचे) डब्ल्यूएचओच्या विभागीय संचालिका डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर दिला आहे. 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना त्यांनी सांगितलं की, कोरोना संक्रमणाची नवीन लाट संपूर्ण देशात पसरत आहे. त्यामुळे लशीचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विशेष म्हणजे देशात दररोज सरासरी 26 लाख डोस दिले जात आहेत. याबाबतीत केवळ अमेरिकाच भारतापेक्षा पुढं आहे. तिथे दररोज सरासरी 30 लाख डोस दिले जात आहेत. (हे वाचा - Coronavirus In Maharashtra : रिकव्हरी कमी, पॉझिटिव्ह रेट वाढला; राज्यातील नवे कोरोना रुग्ण पुन्हा 50,000 पार) लॉकडाऊन जाहीर करण्याबाबत पुण्यातील तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवला आहे. प्रोफेसर एल. एस. शशिधरा यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी लॉकडाउन दरम्यानही पुण्यात अनेक ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट होते. पण लॉकडाउन हटवल्यानंतर लगेच कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ झाली. तेव्हा 10 दिवसांच्या लॉकडाउनमुळे फारसा फरक पडला नव्हता. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. लॉकडाउन दरम्यानही छोट्या-छोट्या गटात वेगाने कोरोनाचा प्रसार होईल. त्यानंतर लॉकडाउन हटवताच ते अधिक वेगाने पसरेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona spread, Corona vaccination, Pandemic, Who, World health day

    पुढील बातम्या