मॉस्को, 2 एप्रिल: कोरोनाचा (Covid-19) प्रकोपानंतर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोनापासून बचावासाठी लस शोधण्याचं काम जोरात सुरू झालं. रशियाने सर्वात प्रथम क्लिनिकल ट्रायलनंतर स्पुतनिक व्ही (Sputnic V) लशीला परवानगी दिली. त्यानंतर एस्ट्राझेनका, फायजर, भारत बायोटेक यांच्यासह अनेक कंपन्यांनी लस तयार केली. आता रशियाने कोरोनापासून प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्या लशीची (corona vaccine for animals) निर्मिती केली आहे. या लसीची नोंदणी केली केली आहे. या लसीची निर्मिती पुढील महिन्यापासून करण्यात येणार आहे.
प्राण्यांसाठी (Animal) तयार केलेल्या लसीचं नाव कार्निव्हॅक-कोव्ह (Carnivac-Cov)असून रोझेलखोजनाडझॉरच्या युनिटने ही लस विकसित केली आहे. या व्हॅक्सिनची मागच्या ऑक्टोबरपासून प्राण्यांवर क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात आली आहे. कुत्रा, मांजर, मुंगुस, कोल्हा यासारख्या प्राण्यांवर लसीची चाचणी घेण्यात आली. लस दिल्यानंतर प्राण्यांवर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. उलट प्राण्यांमध्ये 100 टक्के अँटिबॉडीज तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या लसीचा प्रभाव प्राण्यांमध्ये सहा महिन्यांपर्यंत राहतो असं दिसून आलं आहे. अद्यापही या लसीवर संशोधन केले जात असून ती आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लसीची क्षमता पाहता ग्रीक, ऑस्ट्रेलिया, पोलंड, कॅनडा, अमेरिका आमि सिंगापूर या देशातील कंपन्यांनी रशियाशी संपर्क साधला आहे.
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह तरीही प्रियांका गांधी झाल्या क्वारंटाइन, काय आहे कारण? पाहा VIDEO
मानवी शरिरातील कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी रशियाने यापूर्वी तीन लसींची निर्मिती केली आहे. या तीन लसींपैकी स्पुतनिक व्ही (Sputni V)लस सर्वाधिक प्रभावी असल्याने या लसीला सर्वप्रथम आपतकालीन वापराची परवानगी देण्यात आली. त्यानंतर इपिकवॅककोरोना (EpicVacCorona) आणि कोव्हीवॅक (CoviVac) लसीला मंजुरी देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Pet animal, Russia