नवी दिल्ली, 02 एप्रिल: सध्या देशात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. देशातील विविध राजकीय पक्ष आणि स्टार कॅम्पेनर निवडणूकीच्या मैदानात उतरून आपल्या पक्षासाठी प्रचार करत आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये, आसाम अशा राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मतदान सुरू असून अनेक राजकीय पक्षांनी आपला मोर्चा आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांकडे ओळवला आहे. या राज्यातील विधानसभा निवडणूका (Assembly election) तोंडावर येऊन ठेवल्या आहे. अशातच नॅशनल काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना होम क्वारंटाइन (Home quarantine) व्हावं लागलं आहे.
काँग्रेस पक्षाच्या स्टार कॅम्पेनर असणाऱ्या प्रियांका गांधी अलीकडेच कोरोनाची बाधा झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांनतर त्यांनी कोरोनाची चाचणीही करून घेतली आहे. या चाचणीत त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. असं असताना त्यांना होम क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून दिली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना होम क्वारंटाइन का व्हावं लागलं आहे. याचं कारणही त्यांनी संबंधित व्हिडीओमध्ये दिलं आहे.
हाल में कोरोना संक्रमण के संपर्क में आने के चलते मुझे अपना असम दौरा रद्द करना पड़ रहा है। मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी। इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ। मैं कांग्रेस विजय की प्रार्थना करती हूँ pic.twitter.com/B1PlDyR8rc
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी आपली कोरोना चाचणी केली. त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. मात्र त्यांना डॉक्टरांनी काही दिवस घरातच आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांना घरातचं क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. त्यामुळे त्यांचा उद्याचा आसाम दौरा रद्द करण्यात आला आहे.
हे ही वाचा - आसाममध्ये मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये आढळलं EVM, 4 अधिकारी निलंबित
पुढचे सलग तीन दिवस प्रियांका गांधी अनुक्रमे आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या दौऱ्यावर होत्या. अशातच कोरोनाच्या संपर्कात आल्याने त्यांचे तीनही राज्याचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. त्या काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर असल्याने याचा थोड्याफार प्रमाणात निवडणूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित राज्यात प्रचारासाठी येता येणार नसल्याची माहिती देताना त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच संबंधित उमेदवारांनी त्यांनी निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Home quarantine, Priyanka gandhi vadra