नवी दिल्ली 11 जुलै : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएंट पसरत आहेत. अशात आता एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत एकाच महिलेमध्ये कोरोनाचे दोन वेगवेगळे व्हेरिएंट आढळून आले (Woman Infected With 2 Covid-19 Variants) आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचव्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला (Woman Dies After Being Infected With Two Covid-19 Variants) आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संशोधकांची चिंताही वाढली आहे. संशोधकांच्या मते, ही प्रकरणं कोरोनासोबतचा लढा आणखीच अवघड करू शकतात. पर्यटनस्थळी गर्दी करणं पडलं महागात, पुण्यात 400 जणांवर कारवाईचा बडगा ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, 90 वर्षाच्या या महिलेमध्ये एकाचवेळी अल्फा आणि बिटा हे कोरोनाचे दोन व्हेरिएंट आढळले. या महिलेनं लस घेतलेली नव्हती आणि घरीच तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती जास्त बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात महिलेची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. सुरुवातीला महिलेची ऑक्सिजन पातळी चांगली होती. मात्र, नंतर तिची तब्येत बिघडत गेली आणि पाचव्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयातील स्टाफनं महिलेला कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता, हे तपासण्याचा प्रयत्न केला असता यात दोन व्हेरिएंट आढळून आले. तिला अल्फा आणि बिटा व्हेरिएंटची लागण झाली होती. अल्फा सर्वात आधी ब्रिटन आणि बिटा दक्षिण आफ्रीकेत आढळला होता. संशोधक अशा प्रकारची प्रकरणं गंभीरतेनं घेण्याचा सल्ला देत आहेत. गंगा नदीच्या पाण्यात कोरोना नाही; मात्र आढळले… डॉक्टर म्हणाले, की सध्या या गोष्टीबाबत स्पष्टता नाही की दोन्ही व्हेरिएंटचं संक्रमण झाल्यानं महिलेचा मृत्यू झाला की याला दुसरं काही कारण होतं. सध्या याबाबत संशोधन कऱण्यात येत आहे. ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनीही काही दिवसांपूर्वीच असं सांगितलं होतं, की देशातील दोन लोकांना एकाचवेळी दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. शास्त्रज्ञ म्हणाले, की एकापेक्षा अधिक व्हेरिएंटचा संसर्ग रुग्णांवर काय परिणाम करतो हे तपासणं गरजेचं आहे. सोबतच लस घेणाऱ्यांवर एकापेक्षा अधिक व्हेरिएंटचा काय प्रभाव पडतो, याबाबतही अभ्यास करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.