मुंबई, 24 जानेवारी : कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर त्याचे काही ना काही परिणाम दिसत आहेत. काहींना तर विचित्र परिणामांनाही सामोरं जावं लागतं आहेत. त्यातील काही परिणाम चांगले आहेत तर काही वाईट (Changes in Body getting corona vaccination). एका महिलेने तर कोरोना लसीकरणानंतर अशा समस्येला सामोरं जावं लागलं आहे, ज्याचा आपण विचारही केला नसेल (Woman Breast increase after getting corona vaccine).
द सनच्या रिपोर्टनुसार टिकटॉक युझर एली मार्शलने (Elle Marshall) नुकताच आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहेत. ज्यात तिने कोरोना लशीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे (breast size increase after getting covid vaccine).
तिने व्हिडीओत सांगितलं, तिच्या ब्रेस्टचा आकार लगान आहे. आतापर्यंत ती ए कप साइझची ब्रा वापरत होती. पण फायझरची कोरोना लस घेतली तेव्हा तिच्या ब्रेस्टचा आकार वाढला. तिला आता सी कप म्हणजे दोन साइझ जास्त ब्रा लागते.
हे वाचा - साधं शरीर हलवूही शकत नव्हता आणि अचानक नाचूच लागला लकवाग्रस्त रुग्ण; पाहा VIDEO
कोरोना लसीकरणानंतर असा परिणाम दिसल्याने महिलेला चिंता वाटू लागली आहे. कोरोना लशीचा तिच्यावर निगेटिव्ह परिणाम तर पडत नाही ना असं तिला वाटतं आहे.
कोरोना लसीकरणानंतर स्तनांच आकार बदलणारी एल ही एकमेव महिला नाही. तर तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच महिलांनी आपले असे अनुभव मांडले आहेत. बहुतेक महिलांनी त्यांच्या मासिक पाळीतही बदल झाल्याचं सांगितलं आहे.
हे वाचा - आता तर हद्दच झाली! नाक, घशाऐवजी Private part मधून Olympics playersची Corona test
पेशियंड एक्सेस वेबसाईटशी संबंधित डॉक्टर साराह जार्विस यांनी द सनशी बोलताना सांगितलं कोरोना लस घेणाऱ्या महिलांच्या ब्रेस्ट साइझ आणि पीरिअड्सचा कालावधीमध्ये बदलाचं करण प्लेसेबो इफेक्ट असू शकतं. प्लेसेबो इफेक्ट म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना पाहून आपल्यासोबतही तसंच काही होतं आहे, असं वाटू लागतं.
महिलांची मासिक पाळी थोडी मागेपुढे होणं सामान्य आहे आणि कोरोना आधीपासूनच हे सामान्य होतं. ब्रेस्टचा आकार वाढणं लठ्ठपणा आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर अवलंबून आहे. वैद्यकीयदृष्ट्या लस आणि ब्रेस्ट साइझमध्ये बदलाचा थेट संबंध नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Health, Lifestyle