Home /News /lifestyle /

साधं शरीर हलवूही शकत नव्हता; पण असं काही घडलं की अचानक नाचूच लागला लकवाग्रस्त रुग्ण; कशी झाली कमाल पाहा VIDEO

साधं शरीर हलवूही शकत नव्हता; पण असं काही घडलं की अचानक नाचूच लागला लकवाग्रस्त रुग्ण; कशी झाली कमाल पाहा VIDEO

लकवाग्रस्त रुग्णाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होतो आहे.

    मुंबई, 24 जानेवारी : किती तरी दिवस तो अंथरूणाला खिळला होता. आपलं शरीर थोडंही हलवण्याची शक्ती त्याच्यात नव्हती. एखाद्या जिवंत मूर्तीप्रमाणे ते अंथरूणावरच होतं. पण असं काही घडलं की अचानक हाच रुग्ण चक्क डान्स करू लागला (Paralytic Patient Dance Number). लकवाग्रस्त रुग्णाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होतो आहे. सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी वेंकटाद्री यांनी (Nandini Venkatadri) आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे (Hospital Viral Video). व्हिडीओत पाहू शकता एक लकवाग्रस्त रुग्ण (Paralytic Patient) बेडवर झोपलेला आहे. त्याच्या शेजारी दोन नर्स उभ्या आहेत. या नर्स त्याला फिजिओथेरेपी देताना दिसत आहेत (Physiotherapy Exercise Video). पॅरालिसिस रुग्णाकडून त्या एक्सरसाईझ करवून घेत आहेत. पण ही थेरेपी त्याला वेगळ्या पद्धतीने दिली जात होती. हे वाचा - खेळता खेळता उकळत्या पाण्यात पडली; उपचाराशिवाय 3 दिवस घरातच तडफडत राहिली लकवाग्रस्त रुग्णाच्या शरीराची हालचाल व्हावी म्हणून नर्सने मोठ्या आवाजात गाणं लावलं ाआणि स्वतः डान्स करून लागली तिला पाहून रुग्णाच्या अंगात संचारलं. अंथरूणातच रुग्णही तिला पाहून थिरकू लागला. जो रुग्ण आपलं शरीर हलवूही शकत नव्हता. तो चक्क डान्स करू लागला. आनंदाने आपले हात हलवत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदही झळकत होता. नर्सने दिलेल्या या अनोख्या अंदाजातील थेरेपीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. या नर्सचं कौतुक केलं जातं आहे. रुग्णालयात रुग्ण स्वतःला जास्त आजारी असल्याचं समजत असतात. अशा परिस्थितील त्यांच्यात अशा पद्धतीची पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त आहे. यामुळे लवकरात लवकर बरं होण्याची इच्छा रुग्णांमध्ये अधिक वाढेल, अशी प्रतिक्रिया बहुतेक युझर्सनी दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या