मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आता तर हद्दच झाली! नाक, घशाऐवजी Private part मधून Olympics players ची Corona test

आता तर हद्दच झाली! नाक, घशाऐवजी Private part मधून Olympics players ची Corona test

Anal corona test : नाक आणि घशाऐवजी आता प्रायव्हेट पार्टमधून कोरोना टेस्टसाठी नमुने घेतले जात आहेत.

Anal corona test : नाक आणि घशाऐवजी आता प्रायव्हेट पार्टमधून कोरोना टेस्टसाठी नमुने घेतले जात आहेत.

Anal corona test : नाक आणि घशाऐवजी आता प्रायव्हेट पार्टमधून कोरोना टेस्टसाठी नमुने घेतले जात आहेत.

  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 22 जानेवारी : एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे तपासण्यासाठी सामान्यपणे त्या व्यक्तीचे नाक किंवा घशातील नमुने घेतले जात होते.  पण चीनने तर हद्दच केली आहे (China corona test). विंटर ऑलिम्पिकच्या  (Winter Olympics 2022) खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यासाठी चीनने खतरनाक मार्ग निवडला आहे. नाक, घशाऐवजी ऑलिम्पिक प्लेअर्सच्या प्रायव्हेट पार्टमधून नमुने घेतले जात आहेत (China took sample for corona test from private part of olympic players). त्यांची एनल स्वॅब टेस्ट केली जाते आहे (China Anal Swab Test).

चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. त्यात आता 4 फेब्रुवारीला बीजिंग विंटर ऑलिम्पिक्स होणार आहे. यावेळी कोरोना पसरू नये, यासाठी वाट्टेल ते करणारं चीन आता पुन्हा वादात सापडलं आहे. गेल्या वर्षी ज्या एनल स्वॅब टेस्टमुळे  चीन वादात सापडलं होतं, ती टेस्ट चीन ऑलिम्पिक खेळाडूंसाठी वापरताना दिसतं आहे. ऑलिम्पिकआधीची कोरोना टेस्ट करण्यासाठी खेळाडूंच्या गुद्द्दवारातून सॅम्पल घेत आहेत.

हे वाचा - कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने बरा होतो कोरोना? उपायाबाबत डॉक्टर म्हणाले...

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या खेळाडूंनाही या विचित्र टेस्टला सामोरं जावं लागतं आहे. कोरोनाच्या एनल टेस्टमध्ये व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये5 सेंटीमीटरपर्यंत टेस्टिंग किट घुसवलं जातं. त्यानंतर ते आत फिरवलं जातं. तपासणीपूर्वी स्वॅब किट तोडलं जातं. ही टेस्ट वादात असतानाही चीनच्या मते कोरोनाचं निदान करण्यासाठी ही सर्वात सुरक्षित आणि योग्य पद्धत आहे.

विमान प्रवाशांचीही झाली होती एनल स्वॅब टेस्ट

ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी चंगचून ते बीजिंग पॅसेंजर विमानातील प्रवाशांपैकी काही जण हाॅटस्पाॅट क्षेत्रातील (HotSpot Area) असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवलं. त्यानंतर या प्रवाशांची गुदमार्गातून स्वॅब चाचणी करण्यात आली. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, या विषाणूचा धोका असलेला 1000 शाळकरी मुलांचा गट आणि शिक्षकांचीही अशाच पद्धतीने चाचणी करण्यात आली.

चिनी तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू श्वसनमार्गाच्या (Resipatory Track) तुलनेत गुदमार्ग किंवा मलमूत्रात अधिककाळ जिवंत राहतो, त्यामुळे अभ्यासानंतर हे नवे तंत्र चिनी अधिकाऱ्यांकडून अवलंबण्यात येत आहे.

गुदमार्गाद्वारे स्वॅब टेस्ट ही नाक आणि घश्यातील स्वॅब टेस्टच्या तुलनेत अधिक नेमके रिझल्ट देणारी आहे, असं बीजिंग यू अन हाॅस्पिटलमधील श्वसन आणि संसर्गजन्य रोग विभागाचे उपसंचालक ली टोन्झेंग यांनी स्टेट मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तर ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, शांघायमधील हुशान हाॅस्पिटलचे झांग व्हेनहाग यांच्या मते, पेशंटच्या रिकव्हरीनंतर त्याचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी ही टेस्ट उपयुक्त ठरत आहे.

हे वाचा - लसीकरण करणं यासाठी आहे महत्त्वाचं; कोरोना मृतांविषयी डॉक्टरांनी सांगितलं..

या दाव्याचे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समर्थन केलं आहे. ज्यावेळी एखाद्या बरे झालेल्या रुग्णाचा घसा किंवा नाकातून स्वॅब घेतला असता त्याची टेस्ट निगेटिव्ह येते, पण याच रुग्णाच्या गुदमार्गातून स्वॅब घेतला असता टेस्ट पाॅझिटिव्ह येत असल्याचं निदर्शनास आल्या दावा करण्यात आला आहे.

चीनची विचित्र कोरोना टेस्ट वादात

ही प्रक्रिया नाक किंवा घश्यातील स्वॅब घेण्याच्या प्रक्रियेच्या तुलनेत अत्यंतिक त्रासाची आणि गैरसोयीची असल्याची तक्रार काहींनी केली आहे. कोरोनाच्या या नव्या चाचणी पद्धतीच्या कार्यक्षमतेवर वैदयकीय अधिकाऱ्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

वुहान युनिर्व्हसिटीतील पॅथालाॅजी तज्ज्ञ यंग झान्कू चीनमधील ग्लोबल टाईम्सशी बोलताना म्हणाले की, "नाक आणि घशाव्दारे घेतलेले जाणारे स्वॅब हे कोरोना तपासणीसाठी पुरेसे आहेत. रुग्णाच्या मलमूत्रातून केलेल्या तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह होता. मात्र पचन संस्थेद्वारे संक्रमण झाल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत"

First published:

Tags: China, Coronavirus