जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Single dose corona vaccine चा मार्ग मोकळा; Sputnik light ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल

Single dose corona vaccine चा मार्ग मोकळा; Sputnik light ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल

Single dose corona vaccine चा मार्ग मोकळा; Sputnik light ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल

रशियाच्या स्पुतनिक लाइट (Sputnik Light) या सिंगल डोस कोरोना लशीला डीजीसीआयच्या तज्ज्ञ समितीने परवानगी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या कोरोना लशी या डबल डोस कोरोना लशी आहेत. आता सिंगल डोस कोरोना लसही (Single dose)  भारतात दिली जाणार आहे. रशियाच्या स्पुतनिक लाइटला (Sputnik Light) हिरवा कंदील मिळाला आहे. डीजीसीआयच्या (DCGI) तज्ज्ञ समितीने या लशीला परवानगी दिली आहे, अशी सूत्रांनी माहिती दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. भारतात सध्या रशियाच्या स्तुपनिक V कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरला मंजुरी देण्यात आलेली आहे. स्पुतनिक लाइट ही स्पुतनिक V चं पुढील व्हर्जन आहे, अशी माहिती याआधी रशियाने दिली होती. मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. भारतात हैदराबादच्या डॉ. रेड्डी कंपनीने (Dr Reddy’s Laboratories) RDIF करार केला आहे. त्यानुसार या कंपनीमार्फत स्पुतनिक V लस पुरवली जाते आहे. ही लस  adenovirus vector 26 (Ad26) आणि adenovirus vector 5 या दोन घटकांपासून तयार करण्यात आली आहे. तर स्पुतनिक लाइट या लशीत फक्त Ad26 हा घटक आहे. बुस्टर डोस म्हणूनही ही लस प्रभावी ठरली असल्याची माहिती आरडीआयएफने दिली आहे.

जाहिरात

आरडीआयफने दिलेल्या माहितीनुसार स्पुतनिक लाइट लस घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात ही लस डेल्टा व्हेरिएंटवर 70 टक्के प्रभावी ठरली. 28000 लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली. लस न घेतलेल्या 5.6 दशलक्ष लोकांशी त्यांची तुलना करून हा अहवाल सादर करण्यात आला. मॉस्कोमध्ये जुलै 2021 मध्ये हा अभ्यास झाला. हे वाचा -  तीन डोस असणारी स्वदेशी लस बाजारात, सुईविनाच होणार Vaccination; वाचा सविस्तर 60 पेक्षा कमी वयाच्या लोकांवर ही लस 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असलयाचं दिसून आलं आहे. आजाराची तीव्रता कमी करण्यात ही लस मदत करते. त्यामुळे रुग्णालयात जाण्याची वेळ ओढावत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात