Home /News /coronavirus-latest-news /

काय सर्वांना आहे कोरोना व्हॅक्सीनच्या Booster Dose ची आवश्यकता? लवकरच होणार निर्णय

काय सर्वांना आहे कोरोना व्हॅक्सीनच्या Booster Dose ची आवश्यकता? लवकरच होणार निर्णय

Booster Dose

Booster Dose

एनटीएजीआयशी सल्लामसलत केल्यानंतरच केंद्र सरकार कोविड लसीकरण मोहीम आणि बूस्टर डोस (Booster Dose) संदर्भातील आपल्या धोरणात काही बदल करू शकते.

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: कोविड -19 लसीकरणाची (Covid -19 Vaccination) स्थिती आणि दिशा ठरवण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेला नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) सध्या जिथं 97 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) बाधित आहेत, तसेच सर्व लसींचे मूल्य आणि त्यांचे महत्त्व याविषयीच्या डाटाचे मूल्यांकन करत आहे. एनटीएजीआयच्या या मूल्यांकनावरून भारतातील कोविड लसीकरण आणि कोरोना व्यवस्थापनासाठीचे भविष्यातले धोरण ठरणार आहे. एनटीएजीआय आपल्या शिफारशी भारत सरकारला दोन आठवड्यांत सादर करण्याची शक्यता आहे. या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकार कोविड लसीकरण धोरणात कोणत्या सुधारणा करायच्या यावर विचार करेल. यासंदर्भात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एनटीएजीआयशी सल्लामसलत केल्यानंतरच केंद्र सरकार कोविड लसीकरण मोहीम आणि बुस्टर डोस (Booster Dose) संदर्भातील आपल्या धोरणात काही बदल करू शकते. एनटीएजीआयचे हे मूल्यांकन कोरोना संक्रमितांचे निरीक्षण करणाऱ्या भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या निष्कर्षावर आधारित आहे. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने ओमिक्रॉनसह बुस्टर लसीची परिणामकारकता तपासण्याबाबत अभ्यास केला आहे. या अभ्यासासाठी 'सीएमसी'ने लसीकरण आणि सिरो सर्वेक्षणाचा रिअल टाईम डाटा जमा केला आहे. हे वाचा-कोरोनापेक्षाही घातक विषाणू; वर्षानुवर्षे राहातो मेंदूत दडून, मृत्यूदरही 50 टक्के 'एनटीएजीआय'च्या एका सदस्यानं याबाबत सांगितलं की, 'हे झपाट्याने बदलणारे वातावरण आहे. सध्या ओमिक्रॉन हा प्रमुख स्ट्रेन आहे. 95 ते 97 टक्के रुग्ण यामुळे बाधित आहेत. खरंतर काही ठिकाणी 100 टक्के केसेसमध्ये ओमिक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अशा स्थितीत अजून काही वेगळं करण्याची गरज आहे का हे पाहणं गरजेचं आहे. सर्व लसींचे मूल्य, त्यांचे सापेक्ष महत्त्व, कोणती लस फायदेशीर आणि श्रेयस्कर आहे, हे जाणून घेण्यासाठी काही डाटा जमा केला जात आहे. परिस्थिती वेगाने बदल असल्याने देशाच्या लसीकरण कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी असे मूल्यांकन करणे आवश्यक आहे'. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर मुलांमध्ये लसींची गरज आहे का हे पाहण्यासाठी तज्ज्ञ डाटाचे (Data) मूल्यांकन करत आहेत. या व्यतिरिक्त शास्त्रज्ञांचा गट बुस्टर डोसची आवश्यकता आणि परिणामकारकता देखील शोधत आहेत. हे वाचा-Good News..!12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरच मिळणार आणखी एक Corona लस 'एनटीएजीआय'च्या सदस्याने सांगितलं की, 'जगभरात सध्या गोंधळाची स्थिती आहे. काही देशांनी त्यांच्या नागरिकांना लसीचा चौथा डोस दिला आहे, अशा स्थितीत अभ्यास तेथील प्रतिकूल घटना दर्शवत आहे. कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी आम्हाला सर्व घटकांचा विशेषतः ओमिक्रॉन लक्षात घेऊन अभ्यास करावा लागेल'. जानेवारी 2021 मध्ये भारतात कोविड लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यापासून 16 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत देशात कोविड लसीचे एकूण 174 कोटी डोस (Dose) देण्यात आले आहेत. भारतातील 97 टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ लोकसंख्येला कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर सुमारे 79 टक्के प्रौढ व्यक्तींना कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. याशिवाय 1.8 कोटी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात आला आहे.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus cases

पुढील बातम्या