Home /News /coronavirus-latest-news /

40 लाख जणांचे जीव घेतलेला कोरोना आता आणखीच घातक होणार; WHO नं केलेलं वर्णन चिंताजनक

40 लाख जणांचे जीव घेतलेला कोरोना आता आणखीच घातक होणार; WHO नं केलेलं वर्णन चिंताजनक

2019 मध्ये चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोनानं आतापर्यंत जगभरात 40 लाखाहून अधिकांचे बळी घेतले आहेत. तर, आतापर्यंत 18 कोटी 93 लाख जणांना कोरोनाची लागण (Total Corona Cases in World) झाली आहे.

    नवी दिल्ली 16 जुलै : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपात्कालीन समितानं गुरुवारी ज्याप्रकारे इशारा दिला आहे, त्यानुसार कोरोना महमारीचं (Coronavirus) आतापर्यंतचं रूप हे केवळ ट्रेलर आहे. पुढे आणखीच भयंकर चित्र पाहायला मिळणार आहे. आरोग्य संघटनेनं म्हटलं, की येत्या काळात जगभरात कोरोनाचे नवे व्हेरिएंट (New Variant of Covid 19) पसरण्याची शक्यता आहे. यामुळे महामारीसोबतचा लढा आणखीच अवघड होऊ शकतो. समितीनं म्हटलं, की महामारी अजून संपलेली नाही. या गोष्टीची अधिक शक्यता आहे, की जागतिक स्तरावर आणखी भयंकर व्हेरियंट पसरू शकतात. यांच्यावर नियंत्रण मिळवणंही आणखीच अवघड असेल. 2019 मध्ये चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोनानं आतापर्यंत जगभरात 40 लाखाहून अधिकांचे बळी घेतले आहेत. तर, आतापर्यंत 18 कोटी 93 लाख जणांना कोरोनाची लागण (Total Corona Cases in World) झाली आहे. Corona Third Wave : अखेर कोरोनाची तिसरी लाट आलीच; WHO ने केलं अलर्ट कोरोना विषाणू सातत्यानं आपलं रूप बदलत आहे. याच्या डेल्टा व्हेरिएंटनं सध्या बऱ्याच देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारतात दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत मानला जाणारा हा व्हेरिएंट कोरोनाच्या मूळ स्वरुप म्हणजेच अल्फा व्हेरिएंटपेक्षा जास्त घातक आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमागे ही आहेत तीन महत्त्वाची कारणं आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी चीनला पुन्हा एकदा म्हटलं आहे, की महामारीच्या प्रसाराबाबत माहिती मिळवण्यासाठी सहकार्य करा आणि डेटा उपलब्ध करून द्या. ट्रेडोस अदनोम यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं, की कोरोनो कुठून आला याच्या तपासासाठी आरोग्य संघटनेनं एक फ्रेमवर्क तयार केलं आहे. ते म्हणाले, की आशा आहे की यावेळी चांगलं सहकार्य मिळेल. त्यांनी असंही सांगितलं, की सुरुवातीच्या तपासात अनेक अडचणी आल्या होत्या.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus

    पुढील बातम्या