जाहिरात
मराठी बातम्या / देश / देशात Corona व्हायरसच्या संभाव्य तिसरी लाट येण्यामागे आहेत 'ही' तीन महत्त्वाची कारणं

देशात Corona व्हायरसच्या संभाव्य तिसरी लाट येण्यामागे आहेत 'ही' तीन महत्त्वाची कारणं

देशात Corona व्हायरसच्या संभाव्य तिसरी लाट येण्यामागे आहेत 'ही' तीन महत्त्वाची कारणं

Corona Third Wave: दररोज तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. डेल्टा प्लस (Delta Plus variant covid) व्हेरिएंटनंतर नव्यानं कप्पा व्हेरिएंटही भारतात दाखल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जुलै: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली असली तरी डोक्यावर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. दररोज तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. डेल्टा प्लस (Delta Plus variant covid) व्हेरिएंटनंतर नव्यानं कप्पा व्हेरिएंटही भारतात दाखल झाला आहे. या व्हेरिएंटचे रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये आढळून आलेत. आता यामागील कारण काय आहे, हे देखील त्यांना समजून घेतले पाहिजे. या कारणांमुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लसीकरणाचा आकडा कमी याआधी दररोज सुमारे 40 लाख डोस दिले जात होते. मात्र याचा आकडा आता 25 लाखांवर आला आहे. म्हणजे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यासह, दररोज सुमारे 45 टक्के नवीन रुग्ण हे ग्रामीण भागात आढळून येत आहेत. आर्थिक व्यवहारात गती याशिवाय आता देशात आर्थिक व्यवहारात वाढ झाली आहे. त्यामुळे लोक बाहरे वावरताना दिसत आहेत. इतकंच काय तर नागरिकांमध्ये कोरोनाच्या नियमांवरुनही उदासीनता दिसून येते. ज्या पद्धतीनं डेल्टा व्हायरस बदलत आहे आणि आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा जवळपास 9 राज्यांमध्ये शिरकाव झाल. त्यानुसार तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचा-  जामिनानंतर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये दाखल, भारतात कधी येणार? कोरोना व्हायरसच्या नियमांचं पालन न करणं बऱ्याच ठिकाणी कोरोना नियमांचं पालन केलं जात नसल्यानं एकप्रकारे कोविडच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिल्यासारखं आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन पालनं केलं जात नाही. लोकांचा आपसातला संपर्क वाढल्यानं कोरोनाची संख्या वाढत जाते आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाच्या नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात