नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : भारताच्या स्वदेशी कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लसीला (Covid-19 Vaccine) WHO ची मान्य मिळण्यासंदर्भात 3 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. यापूर्वी, भारत-बायोटेकने (Bharat-Biotech) जागतिक आरोग्य संघटनेला लसीचा अतिरिक्त डेटा सादर केला आहे. मात्र खरंतर हा डेटा WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने मागवला होता. या गटाला कोणत्याही लसीसाठी आपत्कालीन वापराचा परवाना देण्याचा अधिकार आहे. समूहाने 26 ऑक्टोबरच्या बैठकीत भारत-बायोटेककडून अतिरिक्त डेटा मागवला होता जेणेकरून अंतिम विश्लेषण करता येईल.
देशातल्या Corona लसीकरणासंदर्भातली मोठी अपडेट, जनतेसाठी नवी मोहिम सुरु
या प्रकरणाची माहिती असलेल्या सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागवण्यात आलेल्या अतिरिक्त डेटामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या इम्युनोजेनिसिटी डेटाचा समावेश आहे. याशिवाय लिंगानुसारही डेटाची मागणी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात तांत्रिक सल्लागार गटाच्या मागणीवरून भारत बायोटेकने हा डेटा सुपूर्द केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता ३ नोव्हेंबरला या लसीला मंजुरी मिळू शकेल, असे मानले जात आहे.
भारत-बायोटेकने 6 जुलै रोजी जागतिक आरोग्य संघटनेला पहिला डॉजियर सादर केला. यानंतर, 27 सप्टेंबर रोजी कंपनीने अतिरिक्त डेटा सादर केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की लस मंजूर करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. फार्मा कंपनी किती लवकर डेटा देते यावरही मंजुरीची प्रक्रिया अवलंबून असते.
कोरोना, डेंग्यूचं थैमान! आजारांच्या संकटात कशी साजरी कराल दिवाळी?
WHO ने आतापर्यंत जगातील सात कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. संस्थेच्या धोरणात्मक सल्लागार गटाने यापूर्वीच कोव्हॅक्सिन लसीचे विश्लेषण केले आहे.
गेल्या आठवड्यात, देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देखील सांगितले होते - WHO कडे एक प्रणाली आहे ज्यामध्ये एक तांत्रिक समिती आहे जी कोव्हॅक्सिन लस मंजूर करणार आहे. WHO च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना, काही देशांनी या लसीला मान्यता दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.