जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus: कधी होणार कोरोनाचा The End... भारतातील मोठ्या वैज्ञानिकांनी दिलं उत्तर

Coronavirus: कधी होणार कोरोनाचा The End... भारतातील मोठ्या वैज्ञानिकांनी दिलं उत्तर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोनाचं थैमान अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या कोरोनाचं थैमान कधी थांबणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : भारतासह संपूर्ण जगभरात अद्यापही कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरूच आहे. अद्यापही भारतात दोन लाखांच्या आसपास कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या नोंदवली जात आहे. दोन वर्षांहून अधिक काळ कोरोनाचं थैमान सुरू आहे. लाखो नागरिकांचे जीव घेतलेल्या या कोरोनाचा एन्ड कधी होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. या प्रश्नावर शास्त्रज्ज्ञ कुठलेही स्पष्ट उत्तर देऊ शकलेले नाहीयेत. भारतातील CSIR (कौन्सिल ऑफ सायंटेफिक अँण्ड रिसर्च) कोरोना विषाणू समजून घेण्यासाठी सातत्याने संशोधन करत आहेत. सीएसआयआरमधील इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे संचालक डॉ अनुराग अग्रवाल (Dr Anurag Agrawal) यांनी कोरोनाच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. पण लखनऊ, कानपूर, पाटणा, वडोदरा, सुरत या टिअर 2 शहरांमध्ये अद्यापही समस्या कायम आहे. यापैकी काही शहरांवर अद्याप परिणाम झालेला नाहीये. नक्कीच, संपूर्ण भारतात कोरोना संसर्गाचा वेग सारखा नाहीये, त्यामुळे येत्या काळात काही ठिकाणी कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. वाचा :  11 वर्षीय मुलाला वर्षभरातच अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉनचा विळखा; कशी झाली अवस्था पाहा शाळा बंद करण्यात अर्थ नाही इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अनुराग अग्रवाल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, कोविड-19 अद्याप संपलेला नाही. ते कधी संपेल हे निश्चितपणे सांगते येणार नाही. पण, आता शाळा सुरू करण्याची वेळ आली आहे. असे करत असताना आपल्याला विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्याला यापूर्वी शाळा सुरू करायला हव्या होत्या. खरं सांगायचं तर मोठ्या शहरांमध्ये शाळा बंद करण्यात अर्थ नाही. कोरोनाचा शेवट हा साथीच्या रोगाचा शेवट म्हणून आपण पाहू नये. कोरोना व्हायरसचे धोकादायक म्यूटेशन कधी थांबेल? अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, व्हायरस आणि रोगप्रतिकारक शक्तीबाबत अजूनही आपल्यात संभ्रम कायम आहे. जेव्हा स्पेनने दक्षिण अमेरिकेवर आक्रमण केलं तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत अनेक रोग आणि विषाणू आणले. पण मनोरंजक गोष्ट म्हणजे या विषाणूचा युरोपवर परिणाम झाला नाही पण तेथील नागरिकांच्या मृत्यूचं कारण बनलं. त्याचप्रमाणे कांजण्यांमुळे अनेक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दृष्टीकोनातून, कोरोना विषाणू जेव्हा आला तेव्हा सुरुवातीच्या काळात आपल्यापैकी कोणाचीही प्रतिकारकशक्ती तशी नव्हती. त्यामुळे डेल्टा विषाणू इतका आक्रमक झाला. त्यावेळी लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले नव्हते. वाचा :  खूप झाले Online Classes, या कारणांमुळे मुलांनी शाळेत जाणं ठरेल योग्य आता लसीकरण किती महत्त्वाचे आहे हे आपण पाहत आहोत. सामान्यत: असे दिसून येते की, ज्या व्यक्तीला एकदा संसर्ग झाला आहे आणि त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर अशा व्यक्तींना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची शक्यता खूपच कमी होते. ओमायक्रॉन येईपर्यंत 80 ते 90 टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्णपणे झाले होते. यामुळेच ओमायक्रॉनचा आपल्यावर गंभीर परिणाम झाला नाही. अनुराग अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणूचे धोकादायक म्यूटेंट बदलण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे आता त्याचे गंभीर परिणामही कमी होतील. वायरस नष्ट केला जाऊ शकतो? अनुराग अग्रवाल म्हणाले, “जर आपण कांजण्या, पोलिओ आणि इतर फ्लू पाहिले तर त्यावर लस उपलब्ध झाली पण हे आजार अद्यापही आपल्याला त्रास देत आहेत. त्याचप्रमाणे कोविड-19 नष्ट होणार नाही. कालांतराने त्याची तीव्रता कमी होईल पण हायरिस्क असलेल्या नागरिकांवर त्याचा परिणाम होत राहील. पण त्यामुळे होणारे नुकसान आणि त्रास खूप कमी होईल हे निश्चित आहे. जर विषाणूचे स्वरुप अचानक बदलले तर ती एक समस्या बनू शकते, पण सध्या त्याची शक्यता दिसत नाहीये.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात