Home /News /coronavirus-latest-news /

शाळेत जाऊ दे न व! खूप झाले Online Classes, या कारणांमुळे मुलांनी शाळेत जाणं ठरेल योग्य

शाळेत जाऊ दे न व! खूप झाले Online Classes, या कारणांमुळे मुलांनी शाळेत जाणं ठरेल योग्य

कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) शाळा (Schools during coronavirus period) बंद झाल्याने मुले नाराज आहेत, तर ऑनलाइन क्लासमुळे (online classes during coronavirus period) पालक मुलांच्या आरोग्याबाबत (children's health) चिंतेत असल्याचे समोर येऊ लागले आहे

पुढे वाचा ...
हिमानी चंदाना नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) शाळा (Schools during coronavirus period) बंद झाल्याने मुले नाराज आहेत, तर ऑनलाइन क्लासमुळे (online classes during coronavirus period) पालक मुलांच्या आरोग्याबाबत (children's health) चिंतेत असल्याचे समोर येऊ लागले आहे. शाळा सुरू करण्याबाबत (starting a school) चर्चाही सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत विविध तज्ज्ञांसोबतच पालकांचं मत नेमकं काय मत आहे, हे जाणून घेऊयात. 'माझी 7 वर्षांची मुलगी ख्रिसमसच्या वेळी सांताक्लॉजला काहीतरी भेटवस्तू मागायची. पण यावेळी तिने सांताक्लॉजला सांगितले की, ती घरी बसून अस्वस्थ असून तिला शाळेत जायचं आहे, मित्रांना भेटायचं आहे. माझ्या मुलीने अशा पद्धतीने विचार केल्याने मला आश्चर्य वाटलं,' असं हिमानी चंदाना सांगतात. त्या पुढे म्हणाल्या, ' पूर्वी मला असं वाटायचं की ऑनलाइन क्लास सोडले, तर सर्व काही ठीक आहे. कारण मुलांना ऑनलाइन क्लासदरम्यान जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवावा लागायचा. पण आता या सगळ्यात मुलं काय गमावत आहेत, हे जाणवत आहे. शाळा सुरू नसल्यामुळे काहीतरी नवीन शिकण्याची त्यांची इच्छा कमी होते, शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम, कमकुवत सामाजिक कौशल्ये अशा समस्या निर्माण होत आहेत. तर, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात मुलांचा पुन्हा प्रवेश, मुलींनी शाळा सोडण्याची शक्यता आणि शिक्षणाशी संबंधित इतर समस्याही निर्माण होऊ शकतात.' हे वाचा-विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी Online Classes कठीण, आव्हानात्मक ठरतोय कोरोना काळ जगात सर्वाधिक दिवस भारतात शाळा बंद कोरोना महामारीमुळे भारतात मार्च 2020 पासून शाळा पूर्णपणे बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय योग्य होता. पण आता जवळपास 600 दिवस उलटून गेले आहेत तरी अनेक शाळा बंद आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. युनेस्कोच्या मते, जगात सर्वाधिक दिवस भारतातील शाळा बंद राहिल्या आहेत. भारतात 82 आठवडे किंवा जवळपास दीड वर्षे शाळा बंद राहिल्या. हा कालावधी मार्च 2020 ते ऑक्टोबर 2021 मधील आहे. युगांडा येथील शाळा 83 आठवडे बंद होत्या. पण भारतात कोविड-19 मुळे राष्ट्रीय स्तरावर शाळा 25 आठवडे बंद राहिल्या. काही राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या ग्रेडमधील शाळांसह शाळा 57 आठवड्यांसाठी अंशतः बंद होत्या. युनिसेफच्या डेटावरून असं दिसतं की, भारतातील शाळा बंद झाल्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणारे 24.7 करोड विद्यार्थी आणि प्री-स्कूलच्या 2.8 करोड विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. हे वाचा-चिंता वाढवणारी बातमी: NeoCoV खतरनाक Corona व्हेरिएंट? मुलांमध्ये सौम्य लक्षणं कोरोना व्हायरस हा मुलांसाठी घातक असल्याचं आतापर्यंत कोणत्याही डॉक्टरांनी सांगितलं नाही. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये केवळ सौम्य लक्षणं मुलांमध्ये दिसली होती. सरकारी आकडेवारीवरून असंही दिसून आलं आहे की, कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत 20 वर्षांखालील मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण लोकसंख्येच्या दृष्टीने केवळ 12 टक्के होतं. अशा परिस्थितीत, शास्त्रज्ञ आणि लस तज्ज्ञांच्या मते, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोरोना लसीची फारशी गरज नाही. याबाबत एनटीएजीआय ( NTAGI ) पॅनलचे सदस्य डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'भारत सरकारला मी सांगितलं आहे की मुले निरोगी असून त्यांचे आत्ताच लसीकरण करू नये.' मुलांवर नकारात्मक परिणाम ऑनलाइन शिक्षणाद्वारे मुलांमध्ये सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक क्षमता विकसित होऊ शकत नाहीत, असं बाल मानसशास्त्र आणि शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, दीर्घकाळ शाळा बंद राहिल्याने मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. तर, आणखी एका अभ्यासात असं आढळून आलं की सरासरी 92 टक्के मुलांनी विशिष्ट भाषेतील त्यांची क्षमता गमावली आहे. इयत्ता दुसरी ते सहावीमधील 82 टक्के मुलांनी मागील वर्षाच्या तुलनेत त्यांची गणिती क्षमता गमावली आहे. हा अभ्यास 16,000 शाळकरी मुलांवर करण्यात आला. ज्यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमधील शाळांचा समावेश होता. बालरोगतज्ज्ञांनी सांगितले की, शाळा बंद असल्याने मुलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली आहे. डोळे कोरडे पडणं, वजन वाढणं, व्हिटॅमिन डी ची कमरता, चिडचिडा स्वभाव होणं अशा समस्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहेत. इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या एका शोधनिबंधानुसार, कोरोनामुळे लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये मनोसामाजिक, वर्तणूक समस्या आणि चिंता वाढली आहे. हे वाचा-महाराष्ट्रातील मास्क सक्ती हटवणार? मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती युनिसेफच्या अंदाजानुसार, कोरोनापूर्वी केवळ एक चतुर्थांश भारतीय कुटुंबांकडे इंटरनेटची सुविधा होती. त्यामुळे या काळात ऑनलाइन वर्ग कसे शक्य झाले? हा प्रश्न आहे. ऑगस्‍ट 2021 मध्‍ये स्‍कूल चिल्ड्रेन ऑनलाइन आणि ऑफलाइन असं एक सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये ग्रामीण भागातील 1400 शाळांमध्ये केवळ 8 टक्के मुलांना ऑनलाइन क्लासची सुविधा मिळत असून 37 टक्के मुलं शिक्षण घेत नसल्याचं समोर आलं. तर, नॅशनल राईट टू एज्युकेशन फोरम पॉलिसीनुसार, माध्यमिक शाळांतील सुमारे 1 कोटी मुलींची शाळा सुटू शकते. तसंच कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुलींच्या शिक्षणावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनापासून मुलांना वाचवण्यासोबतच कुटुंबातील सदस्यांनाही मुलांद्वारे संसर्ग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता बहुतेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. शिक्षकांचे देखील पूर्णपणे लसीकरण झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा आणि विभाग स्तरावरील कोरोना आजाराशी संबंधित डेटाचा अभ्यास करून शाळा उघडण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या