Home /News /coronavirus-latest-news /

Shocking! 11 वर्षांच्या मुलाला एका वर्षातच Alpha, Delta, Omicron चा विळखा; 3 कोरोना व्हेरिएंट्सशी लढता लढता काय झाली अवस्था पाहा

Shocking! 11 वर्षांच्या मुलाला एका वर्षातच Alpha, Delta, Omicron चा विळखा; 3 कोरोना व्हेरिएंट्सशी लढता लढता काय झाली अवस्था पाहा

11 वर्षांचा मुलगा तिसऱ्यांदा कोरोनाशी झुंज देतो आहे.

    जेरूसालेम, 31 जानेवारी : कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) निदान झालं तरी कित्येकांच्या पायाखालची जमीनच सरकते आहे. कोरोनाशी यशस्वीरित्या झुंज दिल्यानंतर काही लोकांना कोरोनाची पुन्हा लागण होते आहे. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला एकाच वर्षात कोरोनाच्या तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्सने (Corona variants) विळखा घालता (Israel 11 year old boy infected with 3 corona variants). त्यानंतर त्याची काय अवस्था झाली याचा अनुभव त्याने सांगितला आहे. इज्राइलच्या केफर सबामध्ये राहणारा 11 वर्षांचा एलोन हेल्फगॉट.  एका वर्षात तीन कोरोना व्हेरिएंटने संक्रमित झाला. आधी अल्फा (Alpha corona), त्यानंतर डेल्टा (Delta corona) आणि आता ओमिक्रॉनने (Omicron corona) त्याला गाठलं आहे. गेल्या आठवड्यात ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. त्यानंतर तो आयसोलेशनमध्ये आहे. हे वाचा - बेशुद्धावस्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार द टाइम्स ऑफ इज्राइलच्या रिपोर्टनुसार वर्षभरात तो तीन-चार वेळा क्वारंटाइन राहिला आहे. इज्राइली न्यूज चॅनल 12 न्यूजशी बोलताना हेलफगॉटने सांगितलं जेव्हा तो पहिल्यांदा अल्फा व्हेरिएंटने संक्रमित झाला तेव्हा त्याला तीव्र ताप होता. त्याला गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला. पण आता ओमिक्रॉन संसर्ग झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूपच कमी लक्षणं आहे. आधीच्या कोरोना संसर्गाच्या तुलनेत त्याला आता कोरोना संसर्गाची गंभीर लक्षणं नाहीत. तो एकदम ठिक आहे. एका तरुणीलाही वर्षभरात चार वेळा कोरोना याआधी एका तरुणीला एका वर्षात चार वेळा कोरोना झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. chinapress.com च्या रिपोर्टनुसार यूकेमध्ये राहणारी व्हार्टन  (Wharton). सप्टेंबर 2020 मध्ये तिला पहिल्यांदाच कोरोना झाला होता. त्यावेळी ती नोकरी करत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी फेस मास्क असायचा तरी कोरोनाने तिला आपल्या विळख्यात घेतलं. तिला सर्दी झाली होती. नाकातून पाणी वाहत होतं. त्यावेळी तिला होम क्वारंटाइन करण्यात आलं आणि काही दिवसांनी तिने कोरोनावर मात केली. हे वाचा - चिंता वाढवणारी बातमी: NeoCoV खतरनाक Corona व्हेरिएंट? त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये तिचे पालक कोव्हिड पॉझिटिव्ह झाले. दोघंही वेगवेगळ्या रूममध्ये होते. तेव्हा व्हार्टनचीही कोरोना चाचणी करण्यात आली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आढलली. यावेळी तिला ताप नव्हता पण तिचं नाक वाहत होतं. यावेळीही तिने कोरोनाविरोधातील लढा जिंकला. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊन एक महिनाही झाला नाही ती तिसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात आली. अमेरिकेला जात असताना तिची टेस्ट करण्यात आली तेव्हा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. यावेळी तिला साधा सर्दी-खोकला होता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या