Kent Covid Variant; किती भयंकर आहे हा नवा कोरोनाव्हायरस?

Kent Covid Variant; किती भयंकर आहे हा नवा कोरोनाव्हायरस?

कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार 50 हून अधिक देशांत पसरला आहे आणि जगभर पसरण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

  • Share this:

ब्रिटन, 13 फेब्रुवारी : ब्रिटनच्या केंट (Kent) भागात सापडलेली कोरोनाची विषाणूची नवी स्ट्रेन (Kent Covid Variant) ही भयंकर ठरू शकते. कारण कोविड-19 (Covid19) प्रतिबंधक लशींच्या (Vaccines) संरक्षणाचा त्यावर कदाचित उपयोग होणार नाही, असं ब्रिटनच्या जनुकीय सर्वेक्षण कार्यक्रमाच्या (Genetic Surveillance) प्रमुखांनी गुरुवारी (11 जानेवारी) सांगितलं.

कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार  50 हून अधिक देशांत पसरला आहे आणि जगभर पसरण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार केंट कोविड व्हॅरिअंट म्हणून ओळखला जातो.

केंट कोव्हिड व्हॅरिअंट म्हणजे काय?

केंट कोव्हिड व्हॅरिअंटचा उगम काही महिन्यांपूर्वीच झाला असला, तरी तो अगदी सहजपणे ब्रिटनच्या (UK) अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्याची संसर्गक्षमता अधिक आहे आणि तो अधिक घातकही आहे.

केंट कोव्हिड व्हॅरिअंटची लक्षणं

साधारणपणे कोविडची लक्षणं (Symptomes) सारखीच असतात. पण ब्रिटनमध्ये अस्तित्वात असलेल्या अन्य प्रकारांपेक्षा केंट स्ट्रेनची सामान्य लक्षणं वेगळी आहेत. खोकला (Cough) हे केंट स्ट्रेनचं लक्षण पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी 35 टक्के जणांनी नोंदवलं. त्यापाठोपाठ थकवा आणि स्नायूंचा अशक्तपणा 32 टक्के जणांना जाणवला, तर 31 टक्के जणांना डोकेदुखी जाणवली. केंट स्ट्रेनची लागण झालेल्यापैकी एक चतुर्थांश जणांना स्नायूदुखी जाणवली. चव किंवा गंध घेण्याची क्षमता गमावल्याचं लक्षण केवळ प्रत्येकी 15 टक्के जणांनी नोंदवलं.

हे वाचा - देशातील 5 राज्य कोरोनामुक्तीच्या मार्गावर; महाराष्ट्राची सद्यस्थिती काय?

शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या लक्षणांची यादी बदलून त्यात डोकेदुखी आणि थकवा ही लक्षणंही समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

विषाणूचा हा प्रकार अधिक संसर्गक्षम आहे?

'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार,  इंग्लंडमध्ये केंट व्हॅरिअंटची लागण झालेल्या लोकांपैकी 53 टक्के जणांनी सांगितलं, की त्यांना कोविड-19 ची लक्षणं दिसत आहेत. अन्य प्रकारांची लागण झालेल्यांपैकी 48 टक्के जणांना ही लक्षणं दिसली. केंट व्हॅरिअंटची लागण झालेल्यांमध्ये खोकल्याचं प्रमाण अधिक असल्याने त्याचा प्रसार अधिक सहजपणे होतो आहे. वुहानमध्ये उगम पावलेल्या मूळ विषाणूपेक्षा केंटमध्ये उगम पावलेल्या विषाणूमध्ये 23 बदल आहेत. त्यापैकी काहींमुळे शरीराच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि लक्षणांमध्ये बदल होऊ शकतो.

लशीमध्ये काही बदल करण्याची गरज आहे?

एका ताज्या अभ्यासात असं आढळलं आहे, की केंटमधल्या स्ट्रेनने दक्षिण आफ्रिकेतल्या स्ट्रेनप्रमाणेच स्वतःत बदल (Mutation) केलं असून, त्यामुळे लशीला प्रतिरोध करण्याची त्याची क्षमता वाढली आहे.

हे वाचा - आजीबाई जोरात कोरोना कोमात! 116 वर्षांच्या महिलेनं 3 आठवड्यात केली Covid वर मात

हे म्युटेशन E484K या नावानं ओळखलं जात असून, ते कोरोना विषाणूच्या दक्षिण आफ्रिकेतील आणि ब्राझीलमधील प्रकारांमध्येही आधीपासूनच आहे. त्यामुळे जुन्या कोरोना विषाणूमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज म्युटेशन झालेल्या विषाणूशी लढण्यात अयशस्वी ठरू शकतात.

लशीमध्ये बदल करणं किती कठीण आहे?

लशीमध्ये आवश्यकतेनुसार रासायनिक बदल करणं हे कागदावर सोपं वाटत असलं, तरी मूळ रचनेत चार-पाच बदल करण्यासाठी काही महिने लागू शकतात.

पुन्हा सीमाबंदी (Border Sealing) करावी लागेल?

सीमाबंदी करणं किंवा सगळंच बंद करण्यामुळे विषाणूचा प्रसार थोडा लांबेल; पण त्याची खूप मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. म्हणून ब्रिटनने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडप्रमाणे धोरण अवलंबलं आहे. ठरावीक देशांमधून येणाऱ्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन केलं जात असून, जेणेकरून कोरोना विषाणूचे आणखी नवे प्रकार देशात येण्यावर निर्बंध घातले जाऊ शकतील.

Published by: Aiman Desai
First published: February 13, 2021, 12:48 PM IST

ताज्या बातम्या