देशातील 5 राज्य कोरोनामुक्तीच्या मार्गावर; महाराष्ट्राची सद्यस्थिती काय?
या पाच राज्यांसह आता भारतानं कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
|
1/ 5
भारतात एकिकडे कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचं दिसतं आहेत.
2/ 5
देशातील केंद्रशासित प्रदेश आणि पाच राज्ये कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. या राज्यांमध्ये 24 तासांत कोरोनाव्हायरसचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही.
3/ 5
केंद्र सरकारनं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार 5 राज्ये आणि दादरा-नगर हवेली, दिव-दमण, लडाख, अंदमान-निकोबार इथल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे.
4/ 5
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत 9 हजार 309 नवीन रुग्ण भेटले आहेत. 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 8 लाख 80 हजार झाली आहे. 1 लाख 55 हजार 447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 35 हजार 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5/ 5
देशात महाराष्ट्र आणि केरळमधील परिस्थिती गंभीर आहे. या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना प्रकरणं आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 20 लाख 52 हजार 905 रुग्णांची नोंद आहे. 51 हजार 415 रुग्णांची आपला जीव गमावला आहे. केरळमध्ये 9 लाख 88 हजार 656 कोरोना रुग्ण आहेत. इथं 3 हजार 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.