मुंबई, 14 एप्रिल : डिसेंबर, 2019 मध्ये चीनच्या (china) वुहान शहरात कोरोनाव्हायरसचा (CoronaVirus) उद्रेक झाला. हळूहळू या व्हायरसने इतर देशातही आपले हातपाय पसरले. आज हा व्हायरस जगभरात थैमान घालतो. त्याने लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे, तर हजारो लोकांचा बळी घेतला आहे.
या व्हायरसचा नाश करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत. आणि अशाच अभ्यासातून या व्हायरसबाबत हळूहळू माहिती मिळते आहे. 5 महिन्यांपूर्वी हा व्हायरस नवा होता, आता त्याच्याबाबत बरीचशी माहिती मिळाली आहे.
कुठून आला कोरोनाव्हायरस?
आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार वटवाघळांना या व्हायरसचा स्रोत मानला जातो आहे. त्याआधी हा व्हायरस सापातून आल्याचं म्हटलं जात होतं. पँगोलीन्स या प्राण्यामार्फत वटवाघळापासून माणसांपर्यंत हा व्हायास पोहोचला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
कोरोनाव्हायरसचा माणसांवर काय परिणाम होतो?
कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला सर्दी, ताप, खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यात त्रास, स्नायूंमध्ये वेदना, अशक्तपणा अशा समस्या उद्भवतात. हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. या व्हायरसची लक्षणं दिसण्याचा कालावधी 14 दिवसांचा आहे.
काही प्रकरणांमध्ये लक्षणं दिसतही नाही. तर काही रुग्णांच्या मेंदूवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांना दिसून आलं.
कसा पसरतो कोरोनाव्हायरस?
कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणा-या व्यक्तीलाही या व्हायरसची लागण होते. शिंक आणि खोकल्यातून निघणा-या थेंबांवाटे हा व्हायरस पसरतो. असे थेंब एखाद्या वस्तूंवर असल्यास त्या वस्तूंनामार्फतही व्हायरस पसरू शकतो. कारण विविध पृष्ठभागावर आणि हवेत तो काही वेळ जिवंत राहतो.
कोरोनामुळे मृत्यू का होतो?
कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणारे सर्वाधिक रुग्ण वयस्कर आहेत किंवा त्यांना आधीपासून गंभीर आजार आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्यास व्हायरसचा प्रभाव जास्त होतो आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे, त्यांच्यावर या व्हायरसचा परिणाम फारसा होत नाही.
एकदा कोरोनाव्हायरस झाल्यानंतर पुन्हा व्हायरसची लागण होते?
तज्ज्ञांच्या मते कोणताही आजार झाल्यानंतर बरं झाल्यावरही त्याचे काही विषाणू शरीरात असतात. मात्र एकदा व्हायरसची लागण झाल्यानंतर त्याचा फार सा परिणाम होत नाही कारण शरीर त्याच्याशी लढण्यासाठी तयार झालेलं असतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात.
कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक
अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona