मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /VIDEO : 20 किमीचं अंतर 20 मिनिटांत केलं पूर्ण; पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे 38 रुग्णांचे वाचले प्राण

VIDEO : 20 किमीचं अंतर 20 मिनिटांत केलं पूर्ण; पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे 38 रुग्णांचे वाचले प्राण

देशातील अनेक भागाता ऑक्सिजनच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे तडफडून रुग्णांचे जीव गेले आहे. त्यात या पोलिसांनी तब्बल 38 जणांचा जीव वाचवला आहे.

देशातील अनेक भागाता ऑक्सिजनच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे तडफडून रुग्णांचे जीव गेले आहे. त्यात या पोलिसांनी तब्बल 38 जणांचा जीव वाचवला आहे.

देशातील अनेक भागाता ऑक्सिजनच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे तडफडून रुग्णांचे जीव गेले आहे. त्यात या पोलिसांनी तब्बल 38 जणांचा जीव वाचवला आहे.

गुजरात, 29 एप्रिल : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात ऑक्सीजन (Oxygen) आणि आवश्यक औषधांची मोठ्या प्रमाणात कमतरता पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडील कोरोना योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी घर-दार विसरून दिवसराचे चोविस तास रुग्णसेवेसाठी जीवाचं रान करीत आहेत.

गुजरातमधील अहमदाबादच्या वस्त्रापूरमध्ये एका खासगी रुग्णालयात अचानक ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. या रुग्णालयात ICU मध्ये 8 आणि अन्य बेडवर 30 कोरोना रुग्ण होते. या सर्व कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) विविध ठिकाणी बंदोबस्त करीत ग्रीन कॉरिडोर तयार केलं आणि या रस्त्याच्या माध्यमातून 20 किलोमीटरपर्यंत अंतर अवघ्या 20 मिनिटात पार केलं. आणि या रुग्णांना ऑक्सिजन पुरवलं. पोलिसांनी धाडस दाखवित 38 रुग्णांना वेळेत ऑक्सिजन सप्लाय मिळू शकला. त्यामुळे डॉक्टरांचं मोठं कौतुक होत आहे.

हे ही वाचा-कोरोनामुळे वास घेण्याची क्षमता गेल्यानंतर काय करावं? तज्ज्ञांनी सांगितला उपाय

" isDesktop="true" id="545370" >

देशात कोरोना संसर्ग झपाट्याने (Corona in India) वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांचे रेकॉर्ड ब्रेक आकडे समोर येत आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यांंमध्ये बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. या भयानक स्थितीत लोकांना रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील झाले असून आणि रुग्णांचा उपचाराविना मृत्यू (Corona Death) होत आहे. बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

First published:

Tags: Corona spread, Gujrat, Police