जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / फक्त एकच लस कोरोनाचा करणार खात्मा; प्रत्येक व्हेरिएंटसाठी Super vaccine तयार

फक्त एकच लस कोरोनाचा करणार खात्मा; प्रत्येक व्हेरिएंटसाठी Super vaccine तयार

फक्त एकच लस कोरोनाचा करणार खात्मा; प्रत्येक व्हेरिएंटसाठी Super vaccine तयार

कोरोनाच्या प्रत्येक रुपावर ही कोरोना लस भारी पडेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 23 जून : सध्या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) डेल्टा प्लस (Delta plus) व्हायरसने चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत या व्हेरिएंट्सचे (Corona Variant) 40 प्रकरणं सापडली आहेत. सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत. कोरोनाच्या या स्ट्रेनवर लशीचाही (Corona strain) प्रभाव होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे कोरोनाच्या नवनवीन रुपांवर कोरोना लस (Corona vaccine) किती प्रभावी ठरेल असा प्रश्न उपस्थित होतोच. पण आता त्याची काळजी करण्याची गरजच नाही. कोरोनाच्या प्रत्येक रुपाला टक्कर देईल, अशी युनिव्हर्सल वॅक्सिन (Universal Corona Vaccine) तयार होते आहे. या लशीला सुपर वॅक्सिनही (Super Corona vaccine) म्हणू शकता. पीटीआयच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही लस तयार केली असून त्यावर सध्या अभ्यास सुरू आहे. कोविड-19 शिवाय कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंट्सवर ही लस प्रभावी आहे. हे वाचा -  कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका! mRNA  पद्धतीने ही लस तयार करण्यात आली आहे.  ही लस sarbecoviruses  वर हल्ला करते. हा कोरोनाव्हायरस कुटुंबातीलच एक भाग आहे. याच व्हारसच्या SARS आणि कोविड-19 या  दोन व्हेरिएंटस सुरुवातीला  दोन दशकांत थैमान घातलं आहे. या लशीचं उंदरांवर ट्रायल करण्यात आलं. ज्या उंदरांवर या लशीचा प्रयोग करण्यात आला त्यांच्यामध्ये कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट्स होते. ट्रायलमध्ये  या लशीने अशा अँटिबॉ़डी विकसित केल्या ज्या कित्येक स्पाइक प्रोटिनचा सामना करू शकतात. आता लवकरच या लशीचं मानवी चाचणीही केली जाईल. हे वाचा -  नागरिकांचा निष्काळजीपणा, कोरोना लसीकरणासंदर्भात राज्य विभागाची धक्कादायक माहिती जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तर युनिव्हर्सल लस तयार होईल आणि कोरोनाच्या कोणत्याही महासाथीला रोखू शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात