कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका!

देशातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) खूपच घातक ठरली. प्रौढ व्यक्तींबरोबरच लहान मुलांमध्येही (Children) कोरोनाचे गंभीर परिणाम दिसून आले.

देशातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) खूपच घातक ठरली. प्रौढ व्यक्तींबरोबरच लहान मुलांमध्येही (Children) कोरोनाचे गंभीर परिणाम दिसून आले.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 जून : देशातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) खूपच घातक ठरली. प्रौढ व्यक्तींबरोबरच लहान मुलांमध्येही (Children) कोरोनाचे गंभीर परिणाम दिसून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक चिंताजनक स्थिती ठरली ती म्हणजे लॉन्ग कोविड (Long Covid). यात कोरोनामुक्त झाल्यानंतर दीर्घकाळ लक्षणे कायम राहतात किंवा संसर्गातून बरे झाल्यानंतर इतर आजार रुग्णांना घेरतात की ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या मोठ्या संसर्गाचा लहान मुलांवरही परिणाम दिसून आला. संसर्गाची स्थिती निवळली तरी अनेक लहान मुलांना नवे आजार झाल्याचे दिसून आले. याबाबत न्यूज 18 डॉट कॉमने गुरुग्राम येथील सी.के. बिर्ला रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि नवजात विज्ञान विभागाच्या डॉ. श्रेया दुबे यांच्याशी चर्चा केली. डॉ. दुबे यांनी न्यूज 18 ला सांगितले की कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण लक्षणीय होते. मल्टिसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MIS) या विकाराने ग्रस्त मुलांची संख्या वाढलेली दिसली. खरंतर मुलांमध्ये दीर्घकाळ कोरोनाची लक्षणे दिसण्याबाबतचा फारसा डेटा (Data) उपलब्ध नाही. मात्र अनेक केसेसच्या अहवालावरुन असे संकेत मिळतात की प्रौढ व्यक्तींप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील कोरोनामुक्त झाल्यानंतरही लक्षणे दिसून येऊ शकतात. `कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका` लॉंग कोविडमध्ये थकवा, भूक मंदावणे, छातीत दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे, घशात खवखव आणि कॉनसनट्रेशनची कमतरता ही लक्षणे दिसून येतात. डॉ. दुबे यांनी सांगितले की लॉंग कोविड मधून बरे होण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे आणि सातत्याने गरम पाणी पिणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मुलांमध्ये लॉंग कोविडची लक्षणे दिसत असतील किंवा लहान मुलं सातत्याने थकवा आल्याचे सांगत असतील, तर त्यांच्यावर अभ्यासाचा बोजा न टाकता, लक्षणे गांभिर्याने घ्यावीत. 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या आणि कोरोनामुक्त बालकांसाठी स्तनपान आवश्यक आहे. त्यासोबतच फायबर, व्हिटॅमिन, मिनरल आणि प्रोटीन सह पोषक आहार त्यांना आजारातून लवकर बरे होण्यासाठी उपयुक्त ठरतो. मोठ्या मुलांसाठी श्वसनाचे व्यायम देखील फायदेशीर ठरतात. डॉ. दुबे यांनी सांगितले की, लहान मुलांमधील लॉंग कोविड हा प्रकार तसा अजून नवा असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळी लक्षणे असू शकतात. खोकला, सांधेदुखी, चट्टे, एलर्जी, पोटदुखी, खाज, हात, पाय थंड पडणे तसेच निद्रानाश अशा सामान्य लक्षणांचा यात समावेश होतो. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नये, लक्षणांमध्ये सातत्य असेल तर बालरोग तज्ज्ञांचा (Paediatrician) सल्ला घ्यावा, असे डॉ. दुबे यांनी स्पष्ट केले.
First published: