हैदराबाद, 04 जून : कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा जीव गेला आहे. कोरोनाची लागण झालेल्या कित्येक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाने प्राण्यांचाही जीव घ्यायला सुरुवात केली आहे. देशातील पहिल्या प्राण्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत (Tamilnadu) कोरोनाची लागण झालेल्या सिंहापैकी एका सिंहाचा मृत्यू झाला (Corona positive lion died) आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तामिळनाडूच्या अरिगनर अण्णा प्राणीसंग्रहायातील (Arignar Anna Zoological Park) एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी आठ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार प्राणीसंग्रहालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 6.15 वाजता या सिंहाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसताच तात्काळ उपचार सुरू करण्यात आले होते.
हे वाचा - 'आमच्याकडे नाही, अमेरिकेतच शोधा', कोरोनाच्या उगमावरून चीनच्या उलट्या बोंबा
मे महिन्यात प्राणीसंग्रहालयातील सफारी पार्कमध्ये पशुवैद्यकीय पथकाला प्राण्यांच्या देखभालवेळी सिंहांना भूक न लागणं, नाकातून पाणी येणं, कफ यांसारख्या समस्या आढळल्या होत्या. त्यावरूनच त्यांची टेस्ट करण्यात आली आहे. अकरा सिंहांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी नऊ सिंहांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. भारतात प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याचं हे पहिलंच प्रकरण आणि आत त्याच सिंहांपैकी एका सिंहाचा मृत्यूही झाला आहे. या प्राणीसंग्रहालयात काम करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
हे वाचा - पुणेकरांसाठी गुड न्यूज! रिकव्हरी रेट ठरला देशात सर्वाधिक, लसीकरण 11 लाखांच्या वर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus