मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /'या' देशात ट्रकचालकांचा एल्गार, सक्तीच्या लसीकरणावरून दिला गंभीर इशारा

'या' देशात ट्रकचालकांचा एल्गार, सक्तीच्या लसीकरणावरून दिला गंभीर इशारा

लसीकऱणाच्या सक्तीविरोधात कॅनडात हजारो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरले आहेत. सक्ती मागे घेतली नाही, तर महागाईचा भडका उडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लसीकऱणाच्या सक्तीविरोधात कॅनडात हजारो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरले आहेत. सक्ती मागे घेतली नाही, तर महागाईचा भडका उडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लसीकऱणाच्या सक्तीविरोधात कॅनडात हजारो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरले आहेत. सक्ती मागे घेतली नाही, तर महागाईचा भडका उडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टोरांटो, 24 जानेवारी: सरकारने (Government) केलेल्या लसीकरणाच्या सक्तीविरोधात (Vaccination mandate) कॅनडातील (Canada) ट्रकचालक (Truckers) रस्त्यावर उतरले आहेत. सरकारनं केलेली लसीकरणाची सक्ती चुकीची असून त्यामुळे पुन्हा एकदा वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा इशारा ट्रक चालकांच्या संघटनेनं दिला आहे. कॅनडा सरकारनं यापूर्वी ट्रकचालकांना लसीकऱणाच्या सक्तीतून वगळलं होतं. देशात ट्रकचालकांचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर कॅनडा सरकारनं हा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होऊ लागला होता.

ट्रकचालकांसाठी सक्तीचं लसीकरण

ट्रकचालकांना व्यवसाय करण्यासाठी लसीकरण सक्तीचं करण्याचा निर्णय नुकताच कॅनडा सरकारनं घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात हजारो ट्रकचालक रस्त्यावर उतरले असून त्यांनी ‘फ्रीडम कॉनव्हॉय’ असं नाव देत मोर्चाला सुरुवात केली आहे. ट्रकचालकांच्या संघटनेनं सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यााठी निधी उभा करायलाही सुरुवात केली असून आतापर्यंत 22 लाख डॉलरचा निधी उभा करण्यात त्यांना यश मिळालं आहे. इंधन, अन्न आणि या आंदोलनादरम्यान लागणाऱ्या इतर गरजांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.

नव्या कायद्याचा परिणाम

कॅनडा आणि अमेरिकेत व्यापार करणाऱ्या लाखो ट्रकचालकांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. एकूण 1 लाख 60 हजार ट्रकचालकांपैकी 32 हजार ट्रकचालकांना व्यवसाय करणं अशक्य होणार आहे. एकूण ट्रकचालकांपैकी 20 टक्के ट्रकचालकांवर या नियमामुळे बंधनं येणार असून त्याविरोधात ट्रकचालकांनी एल्गार पुकारला आहे.

हे वाचा- अमेरिकेनं Ukraine मधील अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना बोलावलं परत, धाडणार सैनिक

राजधानीपर्यंत मोर्चा

सरकारनं लसीकऱणाची सक्ती करणारा कायदा मागे घ्यावा, यासाठी ट्रकचालकांनी ट्रक मोर्चाचं आयोजन केलं आहे. वॅन्कोअरपासून निघालेला हा मोर्चा राजधानी ओट्टावात धडकणार आहे. मात्र ट्रकचालकांच्या संघटेननं रस्ते वाहतुकीला अडथळा होईल, असा कुठलाही प्रकार करायला मनाई केली आहे. मात्र सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केला नाही, तर मात्र देशात जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचे दर गगनाला भिडू शकतील, असा इशारा देण्यात आला आहे.

First published:

Tags: Canada, Inflation, Vaccination