नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : भारताची स्वदेशी कोरोना व्हॅक्सिन असलेल्या कोव्हॅक्सिनला जगातील अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये रिसस मकाक प्रजातीच्या माकडांनी
(Trials of Covaxin on Rhesus Monkeys) महत्त्वाची भूमिका निभावली. 'गोइंग व्हायरल : मेकिंग ऑफ कोव्हॅक्सिन
(Making of Covaxin) द इनसाईड स्टोरी' या पुस्तकात याबाबतचा उल्लेख आहे. पुस्तकात, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च
(ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी भारतातील ही स्वदेशी लस बनवण्याबद्दल, चाचणी आणि मान्यता याबद्दल अशा काही गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही.
Explainer : कोविड, डेंग्यू, झिकाच्या निदानासाठी कोणत्या चाचण्या आवश्यक?
या पुस्तकात, ICMR च्या महासंचालकांनी कोविड-19 साथीच्या विरोधात भारतीय शास्त्रज्ञांची आव्हाने, लस तयार करण्यासाठी मजबूत प्रयोगशाळा नेटवर्क विकसित करणे, निदान, उपचार आणि सिरोसर्व्हेपर्यंतचे नवीन तंत्रज्ञान यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे
(Journey of India's Covaxin). डॉ. भार्गव म्हणतात की, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की लसीच्या यशोगाथेचे नायक फक्त मानव नाहीत, कारण त्यात 20 माकडांचे योगदान आहे. ज्यांच्यामुळे आपल्यापैकी लाखो लोकांना आता जीवनरक्षक लस मिळाली आहे.
पुस्तकात पुढे सांगतिलं गेलं की आम्ही या टप्प्यावर पोहोचलो जिथे आम्हाला माहित होते की लस लहान प्राण्यांमध्ये अँटीबॉडीज तयार करू शकते, तेव्हा पुढची पायरी म्हणजे माकडांसारख्या मोठ्या प्राण्यांवर त्याची चाचणी करणे ही होती. कारण ज्यांच्या शरीराची रचना आणि रोगप्रतिकारक शक्ती माणसांसारखीच असते. जगभरातील वैद्यकीय संशोधनात वापरले जाणारे, रीसस मकाक माकड या प्रकारच्या संशोधनासाठी सर्वोत्तम मानले जातात.
लस तयार करण्यामागील कथा सांगताना डॉ. भार्गव म्हणाले, ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची लेव्हल 4 प्रयोगशाळा, जी प्राइमेट अभ्यासासाठी भारतातील एकमेव अत्याधुनिक सुविधा आहे. त्यांनी हे महत्त्वाचे संशोधन करण्याचे आव्हान पुन्हा एकदा स्वीकारले. यानंतर, सर्वात मोठा अडथळा हा होता की रीसस मकाक माकडे कोठून आणायची कारण भारतात प्रयोगशाळांमध्ये रीसस मकाकची पैदास होत नाही. यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी भारतातील अनेक प्राणीसंग्रहालय आणि संस्थांशी संपर्क साधला. यासाठी तरुण माकडांची गरज होती ज्यांच्या शरीरात चांगली अँटीबॉडी असेल.
Corona बाबत भारतानं सावध होण्याची गरज, नाहीतर होईल युरोपसारखी परिस्थिती
लसीच्या चाचणीसाठी, ICMR-NIV च्या टीमने महाराष्ट्रातील काही भागात माकडांना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी भेट दिली. त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे या माकडांसमोर अन्नाचे संकट निर्माण झाले होते, त्यामुळे ते घनदाट जंगलात गेले होते. यानंतर शास्त्रज्ञांच्या मदतीसाठी महाराष्ट्र वनविभागाने जंगलांचे स्कॅनिंग करून नागपुरातील माकडांचा माग काढला आणि अशा प्रकारे हे ट्रायल पूर्ण झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.