मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कधी होणार कोरोना महामारीचा शेवट? शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

कधी होणार कोरोना महामारीचा शेवट? शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 फेब्रुवारीपासून देशात कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांमध्ये (Corona Cases in India) घट होण्यास सुरुवात होईल

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 जानेवारी : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Third Wave of Coronavirus) सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता आठ महिन्यांनंतर दैनंदिन संसर्गाचं प्रमाण 20 टक्क्यांच्या पुढे गेलं आहे. याचा अर्थ असा की ज्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे त्यापैकी प्रत्येक पाचव्या व्यक्तीला संसर्ग झालेला आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे.

मुंबईला इतक्या वेगाने विळख्यात घेतोय Omicron; झोप उडवणारी आकडेवारी

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 फेब्रुवारीपासून देशात कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांमध्ये (Corona Cases in India) घट होण्यास सुरुवात होईल. म्हणजेच फेब्रुवारीच्या मध्यांतरानंतर तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. यासोबतच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, शास्त्रज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे, की ओमायक्रॉनने भारतात डेल्टाला रिप्लेस केलं तर यावर्षी मार्च महिन्यापर्यंत भारतात या महामारीचा शेवट सुरू होईल.

WHO च्या यूरोप झोनचे प्रमुख Hans Klunge यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे, की मार्च 2022 मध्येच यूरोपमध्ये कोरोना Pandemic वरुन Endemic रुपात बदलेल. एखादी महामारीचा Eendemic हा टप्पा तेव्हा असतो जेव्हा महामारी इतकी सामान्य होते की ती एखाद्या निरोगी व्यक्तीला गंभीररित्या आजारी करू शकत नाही. तसंच भविष्यात तिची लाटही येत नाही. ही महामारी लोकांमध्येच राहाते आणि त्यांना संक्रमितही करते. मात्र, तिचा परिणाम तितका तीव्र नसतो. जेव्हा यापासून लोकांना धोका राहात नाही तेव्हा त्याला Endemic घोषित करण्यात येतं.

'या' देशात ट्रकचालकांचा एल्गार, सक्तीच्या लसीकरणावरून दिला गंभीर इशारा

भारतातील शास्त्रज्ञांचाही असाच अंदाज आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन अगदी जलद गतीने पसरत आहे. यामुळे लवकरच हा व्हेरिएंट भारतात डेल्टाला रिप्लेस करेल. म्हणजे भारतात येणारी कोरोनाची प्रकरणे ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच असतील. यामुळे कोरोना मार्च 2022 पर्यंत endemic stage मध्ये पोहोचेल.

First published:

Tags: Corona spread, Corona updates