Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल SBI च्या ताज्या अहवालात माहिती, कुठल्या महिन्यात असेल Peak?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल SBI च्या ताज्या अहवालात माहिती, कुठल्या महिन्यात असेल Peak?

ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात होईल आणि सप्टेंबर महिन्यात ही लाट कळस गाठेल, असं एसबीआयच्या ताज्या अहवालात म्हणण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 5 जुलै : देशातील कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) ओसरत असल्याचं चित्र सध्या देशात आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचं (Third Wave) सावट असून ही लाट कधी येणार आणि त्याचं स्वरूप किती गंभीर असणार, याबाबत अनेक मतमतांतरं आहेत. नुकत्याच याबाबत जाहीर झालेल्या एसबीआयच्या अहवालात (SBI Report) तिसऱ्या लाटेबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट (August) महिन्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात होईल आणि सप्टेंबर (September) महिन्यात ही लाट कळस (Peak) गाठेल, असं एसबीआयच्या ताज्या अहवालात म्हणण्यात आलं आहे. यापूर्वीचा अंदाजही ठरला होता खरा एसबीआयनं यापूर्वीच्या अहवालात मे महिन्यात भारतात दुसरी लाट येईल, असा अंदाज वर्तवला होता. या अंदाजाच्या काही दिवस अगोदरच भारतात दुसरी लाट यायला सुरुवात झाली  आणि मे महिन्यात या लाटेनं कळस गाठला होता. 6 मे या दिवशी देशातील 4 लाख 14 हजार नव्या कोरोना केसेसची एकाच दिवसात नोंद झाली होती. याच काळात महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. ऑगस्ट महिन्यात सावधानतेचा इशारा कोरोनाची तिसरी लाट येत असल्याची चाहूल ऑगस्ट महिन्यात लागायला सुरुवात होईल आणि सप्टेंबरमध्ये या लाटेनं कळस गाठलेला असेल, असं हा अहवाल म्हणतो. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात दैनंदिन आढळणारी रुग्णसंख्या ही 10 हजारांच्या आसपास जाईल. ऑगस्टमध्ये यात वाढ व्हायला सुरुवात होईल असा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. एक लाट अनेक अंदाज एसबीआयच्या रिपोर्टमध्ये ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर त्यापूर्वी विज्ञान-तंत्रज्ञान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तिसरी लाट येणार असल्याचं म्हणण्यात आलं आहे. मात्र त्यापूर्वी जर वेगाने लसीकरण झालं आणि नागरिकानी कोव्हिड प्रोटोकॉलचं नीट पालन केलं, तर मात्र ही लाट आटोक्यात येऊ शकते, असंही या अहवालात म्हणण्यात आलं आहे. हे वाचा -Coronavirus च्या दुसऱ्या लाटेनंतर या राज्याचा मोठा Unlock प्लॅन तिसरी लाट अधिक गंभीर दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट अधिक गंभीर असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत अधिक लोक बाधित होतील, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सध्या मात्र कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असून देशातील पॉझिटीव्हिटी रेटदेखील घटत असल्याचं चित्र आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Coronavirus, SBI

    पुढील बातम्या