Home /News /national /

Coronavirus च्या दुसऱ्या लाटेनंतर या राज्याचा मोठा Unlock प्लॅन; शाळा-कॉलेजही होणार सुरू

Coronavirus च्या दुसऱ्या लाटेनंतर या राज्याचा मोठा Unlock प्लॅन; शाळा-कॉलेजही होणार सुरू

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यातील सगळे व्यवहार सुरळीत करण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

  पटना, 5 जुलै: कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरत असताना राज्यातील सगळे व्यवहार सुरळीत करण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी केली आहे. विशेष म्हणजे सर्व कार्यालयं (Offices) 100 टक्के क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून दुसऱ्या लाटेनंतर शाळा, महाविद्यालयं (Schools and collages) सुरु करणारं बिहार हे देशातील बहुदा पहिलंच राज्य ठरलं आहे. लसीकरण झालेल्या प्रत्येकाला सरकारी कार्यालयात येण्याची मुभा देण्यात आली असून शाळा आणि महाविद्यालयं 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्याची घोषणा बिहार सरकारनं केली आहे. यामध्ये विद्यापीठं, महाविद्यालयं, तंत्रशिक्षण संस्था, सरकारी प्रशिक्षण संस्था आणि अकरावी-बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी आणि 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची विशेष सोय केली जाईल, अशी घोषणाही बिहार सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे. अनलॉक 4 बिहारमध्ये सध्या अनलॉक-3 सुरू असून त्याची मुदत 6 जुलैला संपणार आहे. 7 जुलैपासून अनलॉक-4 सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून आपापल्या जिल्ह्यांतील कोरोना स्थितीचे अहवाल राज्य सरकारनं मागवून घेतले होते. या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर बिहारमधील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचं लक्षात आलं. त्यामुळेच चौथ्या अनलॉकमध्ये बिहारवासियांना मोठा दिलासा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. अनलॉक-4 ची वैशिष्ट्यं
  • सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू होणार. लसीकरण केलेल्या नागरिकांना प्रवेश करता येणार
  • विद्यापीठं, महाविद्यालयं, तंत्रशिक्षण संस्था, सरकारी प्रशिक्षण संस्था आणि अकरावी-बारावीची कॉलेजेस 50 टक्के क्षमतेने
  • शिक्षण संस्थांशी संबंधित सर्वांच्या लसीकरणाची खास सोय
  • रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवायला परवानगी
  हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुरुषांच्या आकड्यात झाला 'हा' मोठा फरक रुग्णसंख्या घटली ताज्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये गेल्या 24 तासात केवळ 109 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 211 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या रिकव्हरी रेट हा 98.47 टक्के आहे. देशाच्या सरासरीपेक्षा हा जर कितीतरी अधिक आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Bihar, Coronavirus

  पुढील बातम्या