नवी दिल्ली, 23 डिसेंबर : कोरोना पुन्हा येईल का, असा प्रश्न आजकाल अनेकांना सतावत आहे. कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे व्हिटॅमीन शरीरात योग्य प्रमाणात असणं आवश्यक असल्याचं आपल्या सगळ्यांना माहीत झालं आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काहीजण घरगुती उपायही करत असतात. आहारात बदल करुन, काही पदार्थांचं सेवन करून किंवा काढ्यांनी आपली इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तर, काही लोक हाडांची मजबुती आणि शारीरीक ताकद वाढवण्यासाठी काही सप्लीमेंटही घेत आहेत. सप्लीमेंटचा आरोग्याला काय फायदा होतो आणि त्या कशा घ्यावत हे जाणून घेऊयात.
खरंतर विविध व्हिटॅमीन आपल्याला आहारामधून मिळणं चांगलं असतं, त्यासाठी भाज्या, फळं, मांसाहारी पदार्थ यांचा आहारात समावेश असावा. मात्र, चांगल्या आहारानंतरही शरीर कमजोर वाटत असेल तर, त्यासाठी काही सप्लिमेंट घेता येऊ शकतात. व्हिटॅमीन डी, व्हिटॅमीन सी, ओमेगा-3, झिंक, मॅग्नेशिएम सप्लीमेंटच्या रुपात घेता येऊ शकतात. पण, कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. स्वत:च्या मनाने कोणताही निर्णय घेऊ नये. या संदर्भात नवभारत टाईम्सने माहिती दिली आहे.
मॅग्नेशियम आणि झिंक
मॅग्नेशियम आणि झिंक एकत्र घेण्याने मोठा फायदा होतो. झिंक आणि मॅग्नेशिअम शरीरामध्ये पसस्पर पूरक काम करतात. मॅग्नेशिअम शरीरातील झिंक लेव्हल चांगली ठेवतं. तर, झिंक मॅग्नेशिअम शरीरात चांगल्या प्रकारे शोषण होण्यास सहाय्य करतं. त्यामुळे ते एकत्रच घ्यावं. ज्यांना पचनासंदर्भात काही समस्या असतील त्यांनी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हाडं मजबूत होते आणि इम्युनिटी चांगली होते. यामुळे मेटबॉलिजम सुधारतं आणि झोपेची समस्या संपते. त्वचा नितळ होते आणि शरीरातलं इलेक्ट्रोलाइट संतुलन चांगलं होतं.
हे वाचा - या पाच सवयी विसरला असाल, तर पुन्हा एकदा कराव्या लागतील सुरू
व्हिटॅमिन डी-3 आणि मॅग्नेशियम
झिंक प्रमाणे व्हिटॅमिन डी-3 आणि मॅग्नेशियम एकत्र घेण्यानेही फायदा होतो. मॅग्नेशिएम व्हिटॅमिन डी-3 च्या शोषणासाठी मदत करतं. किडनी आणि लिव्हरवरील ऍजाईम कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डी-3 ला मॅग्नेशिअमची गरज असते. व्हिटॅमिन डी मुळे दात, हाडं मजबूत होतात. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. तर, मॅग्नेशिएम मसल्स रिलॅक्स करण्याचं काम करतं.
हे वाचा - कोरोनाविरोधात भारताकडे आणखी एक शस्त्र, भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सिन सज्ज
व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-3
व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-3च (Vitamin D and Omega-3) एकत्र सेवन फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातलं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येतं. ओमेगा-3, व्हिटॅमिन ई हे देखील फायदेशीर आहेत. युएस नॅश्नल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या माहितीनुसार कोरोनरी आर्टरी डिसीसच्या व्यक्तींनी व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-3 एकत्र घेतल्याने सीरम इन्सुलिन आणि इन्सुलीनचं प्रमाण वाढतं. तर, बॅड कोलेस्ट्रॉलही कंट्रोलमध्ये येतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Health Tips