Coronavirus Vaccine Updates: जगभरात आतापर्यंत 3 कोटी 17 लाख 131 हजार जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. यापैकी 9 लाख 75 हजार (3.06%) जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे 2 कोटी 34 लाख (73%) हून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जगात 74 लाखांहून अधिक सक्रिय केसस आहेत. अनेक देशात कोरोनाची लस तयार करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत सुरू आहे.
यादरम्यान आरोग्य संघटना WHO चे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस महासाथीसाठी विकसित केल्या जाणाऱ्या लसींपैकी (Coronavirus Vaccine) कोणती प्रभावी ठरेल की नाही याची गॅरेंटी देता येऊ शकत नाही. WHO च्या या वक्तव्यामुळे कोरोना लशीबाबत असलेल्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा-खासगी रुग्णालयात पाठवलेल्या 48 कोरोना बाधितांचा मृत्यू, तातडीने चौकशीचे आदेश
ट्रेडोस अधनोम यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. वर्चुअल प्रेस ब्रीफिंगमध्ये ते म्हणाले की, या गोष्टीची काही गॅरेंटी नाही की तयार झाल्यानंतरही कोरोनाची लस नीट काम करेल. ते पुढे म्हणाले की, जितक्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधींवर लशीचं टेस्टिंग होईल, त्यातून एक चांगलं व प्रभावी लस तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतो.
हे ही वाचा-नरेंद्र मोदींचा जगात डंका; सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश
स्पर्धेत सर्वात पुढे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस
कोरोना व्हायरसची लस विकसित करण्यासाठी जगभरात तब्बल 180 पर्यांयावर सध्या काम सुरू आहे आणि विविध संशोधनात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेच्या Moderna Inc ची mrna1273 लस माणसांवर पहिल्या ट्रायलमध्ये यशस्वी ठरली आहे. मात्र एक लस अशीही आहे ज्याकडून सध्या जगातील सर्वाधिक अपेक्षा आहेत. ती आहे ब्रिटेनमधील ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीची लस AZD1222. WHO चे वरिष्ठ संशोधन सौम्या स्वामीनाथन यांचं म्हणणं आहे की ऑक्सफर्डची लस या स्पर्धेत सर्वात पुढे आहे.
लशीच्या वितरणासाठी WHO ने तयार केली यंत्रणा
जागतिक आरोग्य संघटना कोरोना लस विकसित करण्यासाठी जोडलेल्या जागतिक समूह आणि सीइपीआयसह समन्वय करीत आहे. भविष्यात देशांमध्ये लशीचं समान वितरण करण्यासाठी कोवॅक्स नावाची एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी सांगितले की, कोवॅक्स ही लशीच्या विकासाला सक्षम बनवते आणि विविध देशांच्या नागरिकांपर्यंत प्रभावी लस पोहोचली जावे याची यात्री करता येते.