Home /News /national /

नरेंद्र मोदींचा जगात डंका; सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश, या अभिनेत्यालाही मिळाली जागा

नरेंद्र मोदींचा जगात डंका; सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश, या अभिनेत्यालाही मिळाली जागा

TIME 100 Most Influential List

  IME 100 Most Influential List: अमेरिकेतील प्रसिद्ध मॅगजिन टाइमने (TIME 100 Most Influential List) जगातील 100 प्रभावी व्यक्तिमत्वांची सूची जारी केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचाही समावेश आहे. पीएम मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह सामील करण्यात आलं आहे. या यादीत सामील भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्‍ता आणि शाहीन बाग आंदोलनातील सहभागी बिल्किस यांचीही नावे आहेत. पीएम टाइम मॅगजिनने पीएम मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की, लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक केवळ स्वतंत्र्यपणे निवडणुका घेणं नाही. कोणाला किती मतं मिळाली केवळ हेच यातून समोर येतं. भारत देश गेल्या 7 दशकांपासून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारतात 1.3 अरब लोकसंख्येत मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन आदी विविध धर्मांच्या लोकांचा समावेश आहे. हे ही वाचा-नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणार हेलिकॉप्टर टाइम मॅगजिनने केलं मोदींचं कौतुक टाइम मॅगजिनने यापूर्वी आपल्या एका लेखात पीएम मोदींचं कौतुक केलं होतं. मॅगजिनमध्ये मोदी हॅज युनायटेड इंडिया लाइक नो प्राइम मिनिस्टर इन डेकेड्स म्हणजेच मोदींनी भारताला अशा पद्धतीने एकजूट ठेवलं आहे की जे गेल्या अनेक दशकात कोणीच ठेवू शकलं नाही या शीर्षकाखाली लेख छापण्यात आला होता. यामध्ये लिहिलं होतं की, मोदींच्या सामाजिक स्वरुपातील प्रगतीशील नीतींमुळे तमाम भारतीयांनी ज्यामध्ये हिंदू आणि धार्मिक अल्पसंख्यांक याचा समावेश आहे, ते गरीबीतून बाहेर आले आहेत. ही कोणत्याही गेल्या पिढीच्या तुलनेत अधिक जलद गतीने झालं आहे.
  आयुष्मान खुराना एकमेव अभिनेते आहेत ज्याचं नाव टाइम मॅगजिनमध्ये घेण्यात आलं आहे. याबाबत सोशल मीडियावरुन त्याने आनंद व्यक्त केला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Ayushmann Khurrana, PM narendra modi, Time magazine

  पुढील बातम्या