नागपूर, 19 मार्च : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने (Coronavirus peak in maharashtra) वाढत आहे. त्यातही नागपूरमध्येही कोरोनाचा कहर वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही नागपुरात रुग्णसंख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 3235 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून हा आकडा चिंता वाढवणारा आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (35 deaths in 24 hours shocking statistics of coronaviruses in Nagpur)
नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशीही रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावरुन नागरिक कोरोनाबाबत सजग नसल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा-कोरोना लशीमुळे आजारी पडलात तर विमा कंपनी उचलणार खर्च? सरकारने घेतला मोठा निर्णय
नागपूरमधील कोरोनाचं संकट अधिक गडद झाले असून मागच्या 24 तासात नागपूरात 3235 नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. त्याशिवाय सक्रिय आकडा देखील 25 हजारांच्या पार गेला आहे. या पार्श्वभूमीवर आज पालिकेने पाचपावली कोविड सेंटर सुरू केले असून आमदार निवास व व्हिएनआयटी कोविड सेंटर लवकर तयार करण्यात येणार आहे. असे तरी लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी देखील नागपूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावर पाहायला मिळत आहे. ((35 deaths in 24 hours shocking statistics of coronaviruses in Nagpur))
हे ही वाचा-Mask घाला अन् दुरावा मिटवा; मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत नवं संशोधन
तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 22 हजार 663 व्यक्तींना लस देण्यात आली आहे. दुस-या टप्प्यात 6 हजार 811 व्यक्तींना लस देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Nagpur