Home /News /coronavirus-latest-news /

'...ऑफिसमध्येच 18 दिवस आयसोलेट होतो', पॉझिटिव्ह आल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी असा दिला कोरोनाशी लढा

'...ऑफिसमध्येच 18 दिवस आयसोलेट होतो', पॉझिटिव्ह आल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी असा दिला कोरोनाशी लढा

मंगळवारी एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकिलांची चर्चा झाली. काहींनी आपण कोरोनाशी लढा कसा दिला हे सांगितलं तर काहींनी देवाला प्रार्थना केली की लवकराच लवकर ही परिस्थिती सुधारू दे आणि प्रत्यक्ष कोर्टात सुनावण्या सुरू होऊ दे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 02 जून: भारतात सामान्य माणूस कोरोनाचे (Coronavirus in India) आघात सोसतो आहे तसंच देशातील काही महत्त्वाच्या व्यक्तींनाही त्याची झळ पोहोचत आहे. दुसऱ्या लाटेत (Second Wave of Coronavirus) अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात मृत्युही झाले आहेत. मंगळवारी एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकिलांची चर्चा झाली. काहींनी आपण कोरोनाशी लढा कसा दिला हे सांगितलं तर काहींनी देवाला प्रार्थना केली की लवकराच लवकर ही परिस्थिती सुधारू दे आणि प्रत्यक्ष कोर्टात सुनावण्या सुरू होऊ दे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड (Justice DY Chandrachud) म्हणाले, 'मला कोविड झाला. घरातल्या कुणाला संसर्ग होऊ नये म्हणून मी ऑफिसातच राहिलो. मी रिकव्हर होत होतो तेवढ्यात पत्नीलाही कोविडची बाधा झाली. म्हणूनच मला घरी जायचं नव्हतं जेणेकरून इतरांना संसर्ग होऊ नये. मी ऑफिसमध्येच 18 दिवस आयसोलेशनमध्ये राहिलो. या काळात मला साथ दिली ती माझ्या ऑफिसातल्या पुस्तकांनी त्यामुळे मला मानसिक आधारही मिळाला.’ सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचुड आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या पीठासमोर पश्चिम बंगालमधल्या अवैध कोळसा खननासंबंधी खटल्याची सुनावणी ऑनलाईन पद्धतीने सुरू होती त्यावेळी त्यांनी आपलं मत मांडलं. दैनिक भास्करने याबाबत वृत्तं दिलं आहे. हे वाचा-कोरोना संकटात युवराज सिंगचा पुढाकार, गरजूंना अशी करणार मदत या प्रकरणातील एका आरोपीचा जामीन अर्ज ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लूथरा यांनी कोर्टापुढे सादर केला. तेव्हा त्यांनीही आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले,‘ मीही काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झालो होतो. पण नुकतंच कोरोनाविषयीचं संशोधन वाचनात आलं त्यामुळे मला इतरांपेक्षा आपण सुरक्षित आहोत असी जाणीव झाली.’ सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, ‘ मला गेल्यावर्षी जून महिन्यातच कोरोनाचा संसर्ग होऊन गेला. माझ्या शरीरात अँटिबॉडीही तयार झाल्या आहेत आणि मी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यामुळे मला ट्रिपल प्रोटेक्शन आहे.’ दुसरे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले, ‘कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मी माझ्या ऑफिसातच एकटा राहत होतो. स्वत:च सगळी कामं करायचो. एखाद्या वकिलाला त्याच्याच ऑफिसमध्ये एकटं रहायला लागणं खूपच कंटाळवाणं असतं. ऑफिसात कुणीही येत नाही की बाहेर जात नाही. नेहमी गर्दी आणि माणसांची सवय असलेल्या वकिलाला हे थोडं अवघडच जातं.’ हे वाचा-कामगार आयुक्तांशी बाचाबाची भोवली, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, VIDE या जामीन याचिकेच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील महाबीरसिंह यांनीही आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ‘ मी देवाकडे अशी प्रार्थना करतो की हा खटला पुढच्या तारखेला प्रत्यक्ष कोर्टात चालवला जावा.’ हजरजवाबी न्यायमूर्ती चंद्रचुडांनी लगेच त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘माझीही देवाच्या चरणी ही प्रार्थना आहे की लवकरात लवकर देशातील सगळ्यांचं लसीकरण पूर्ण व्हावं आणि सुप्रीम कोर्टातील खटले प्रत्यक्ष चालवले जावेत.’
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Supreme Court of India

पुढील बातम्या