वॉश्गिंटन, 20 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Corona Virus)नवा व्हेरिएंट (New variant) ओमायक्रॉन (Omicron) जगभरात चिंता वाढवली आहे. जगातील बहुतेक लसी कोरोनाच्या झपाट्यानं वाढणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरण्याची शक्यता आहे. एका प्राथमिक संशोधनाच्या आधारे हे सांगण्यात आलं आहे. भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना देखील Omicron च्या संसर्गाचा धोका आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर हा अभ्यास ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे आणि त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. मात्र, यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल. या दोन्ही लसी जगातील बहुतांश देशांमध्ये उपलब्ध नाहीत. सहा महिन्यांनंतर लस अप्रभावी भारताच्या संदर्भात अभ्यासाविषयी बोलताना असं म्हटलं आहे की, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीनं सहा महिन्यांच्या लसीकरणानंतर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याची कोणतीही क्षमता दर्शविली नाही. भारतात, लसीकरण केलेल्या 90 टक्के लोकांना AstraZeneca लस Covishield या ब्रँड नावाखाली मिळाली आहे. या लसीचे 65 दशलक्षाहून अधिक डोस 44 आफ्रिकन देशांमध्ये वितरित केले गेले आहेत. हेही वाचा- ‘लोक पक्ष सोडू नये म्हणून बोलले असतील’ शिवसेनेचं अमित शहांना चोख प्रत्युत्तर
प्राथमिक संशोधनानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन, रशिया आणि चीनमध्ये बनवलेल्या लसी देखील ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कुचकामी किंवा खूपच कमी सक्षम असल्याचं आढळलं आहे. जगातील बहुतेक देशांचे लसीकरण मोहिम या लसींवर आधारित असल्यानं महामारीच्या नवीन लाटेचा प्रभाव व्यापक असू शकतो.
नव्या व्हेरिएंटचा धोका जगातील कोट्यवधी लोकांचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढल्यानं नवीन व्हेरिएंट उदयास येण्याचा धोका वाढतो. हे संशोधन प्रामुख्याने प्रयोगशाळेच्या निकालांवर आधारित आहे. जे मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीची पूर्ण दखल घेत नाहीत. हे संशोधन जगातील लोकांवर होणाऱ्या परिणामांवर आधारित नाही, पण तरीही त्याचे परिणाम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. ‘‘आशा आहे की भारत सुरक्षित’’ दिल्लीत सार्वजनिक आरोग्य संशोधक म्हणून काम करणारे रमणन लक्ष्मीनारायणन म्हणतात की, ओमायक्रॉन संसर्ग भारतात वेगाने वाढेल. मात्र लसीकरणामुळे आणि पूर्वी संसर्ग झालेल्या मोठ्या संख्येनं भारत सुरक्षित राहील अशी आशा आहे. हेही वाचा- ‘..नाहीतर यूकेसारखी वाईट परिस्थिती आपल्याकडेही होईल’; Omicron बाबत एम्सच्या संचालकांचा इशारा
पुढे लक्ष्मीनारायण म्हणाले की, भारतात सरकार बूस्टर डोसचा विचार करत आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटपासून अजूनही खूप धोका आहे. सरकार उर्वरित लोकसंख्येला लसीकरण, किंवा बहुतेकांसाठी दोन डोस, आणि वृद्धांना आणि उच्च धोका असलेल्यांना बूस्टर डोस देण्याच्या कल्पनेवर विचार करत आहे.