मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron चं निदान करण्याची सर्वात सोपी पद्धत; 90 टक्के रुग्णांमध्ये दिसली अशी लक्षणं

Omicron चं निदान करण्याची सर्वात सोपी पद्धत; 90 टक्के रुग्णांमध्ये दिसली अशी लक्षणं

आतापर्यंत जितके ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले त्यापैकी 90 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणं आहेत.

आतापर्यंत जितके ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले त्यापैकी 90 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणं आहेत.

आतापर्यंत जितके ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले त्यापैकी 90 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणं आहेत.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 21 डिसेंबर : संपूर्ण जग आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron) दहशतीत आहे. भारतातही ओमिक्रॉनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहे. महत्त्वाचं म्हणजे ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य (Omicron symptoms)  आहेत किंवा दिसतच नाहीत त्यामुळे याचा वेगाने संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. अशात आता शास्त्रज्ञांना ओमिक्रॉनची अशी काही लक्षणं दिसून (Common symptoms of omicron) आली आहेत जी 90 टक्के रुग्णांमध्ये आढळली आहेत. ज्यामुळे ओमिक्रॉनचं निदान करणं सोपं होईल.

ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं असल्याने किंवा लक्षणंच न दिसल्याने कोरोना टेस्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. सामान्य लक्षणं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजाराची तीव्रता वाढल्यानं त्याचं निदान होतं. तोपर्यंत इतरांपर्यंत आजार पसरलेलाही असतो. आता तज्ज्ञांनी अशी काही लक्षणं सांगितली आहेत, ज्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला आपल्याला ओमिक्रॉनची लागण तर झाली नाही ना, याचं निदान करणं सोपं होईल आणि मग तुम्हाला कोरोना टेस्ट करता येईल.

हे वाचा - 'कदाचित खूप उशीर झाला', Omicron समोर आता आरोग्यमंत्र्यांनीही टेकले हात

तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनची काही लक्षणं इतर व्हेरिएंट्सच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आहेत. ही लक्षणं सामान्य फ्लूशी मिळतीजुळती आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसून आली आहेत.

अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शच्या मते, ओमिक्रॉनमध्ये सुका खोकला आणि घशात खवखव होणं हे सर्वात कॉमन आहे. आतापर्यंत जितके ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले त्यापैकी 90 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणं आहेत. याशिवाय आणखी काही अशी लक्षणं आहेत. ज्यामुळे ओमिक्रॉनचं निदान होईल. आतापर्यंतच्या ओमिक्रॉन रुग्णांमध्ये चक्कर येणं, सर्दी आणि नाक वाहणं अशी समस्या दिसते. ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य आहेत पण हा आजार वेगाने पसरतो आहे. इम्युनिटीवर याचा सर्वात जास्त प्रभाव पडतो आहे.

हे वाचा - Alert! सामान्य वाटणारी समस्याच ओमिक्रॉनचं लक्षण; संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

ओमिक्रॉनबाबत सर्वात आधी सांगणारे डॉ. कोएट्जी यांच्या मते, हा व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत दिसून आला. ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांच्यामध्ये या व्हेरिएंटमुळे डोकेदुधी आणि स्नायूंमध्ये वेदना होत असल्याच्या समस्या उद्भवल्या. अशात खोकला आणि शरीरात वेदाना होत असतील तर लगेच कोरोना टेस्ट करावी.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Health, Lifestyle