मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञांमध्ये दहशत; भारतासह 40 देशांना इशारा

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञांमध्ये दहशत; भारतासह 40 देशांना इशारा

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (UKHSA) या महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत यूकेमध्ये BA.2 ची 400 हून अधिक प्रकरणे नोंदवली आणि सूचित केलं की Omicron चा नवीन प्रकार जवळपास 40 इतर देशांमध्येदेखील आढळला आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 जानेवारी : शास्त्रज्ञ COVID-19 विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या अलीकडेच सापडलेल्या सब-व्हेरिएंटवर (Sub Variant of Omicron) बारीक लक्ष ठेवून आहेत. जेणेकरून भविष्यात साथीच्या रोगाच्या प्रसारावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजू शकेल. अलिकडच्या काही महिन्यांत ओमायक्रॉन प्रकार हा विषाणूचा सर्वात धोकादायक प्रकार बनला आहे. अशात आता ब्रिटीश आरोग्य अधिकार्‍यांनी BA.2 नावाच्या नव्या व्हेरिएंटची शेकडो प्रकरणं नोंदवली आहेत. तर आंतरराष्ट्रीय डाटा असं दर्शवतो की हा व्हेरिएंट कल्पनेपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे.

जराही करु नका दुर्लक्ष... Omicron चं एक नवीन लक्षण आलं समोर

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (UKHSA) या महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत यूकेमध्ये BA.2 ची 400 हून अधिक प्रकरणे नोंदवली आणि सूचित केलं की Omicron चा नवीन प्रकार जवळपास 40 इतर देशांमध्येदेखील आढळला आहे. यात भारत, डेन्मार्क आणि स्वीडन सारख्या काही देशांमध्ये सर्वात अलीकडील प्रकरणांमध्ये सब-व्हेरिएंटशी संबंधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

UKHSA ने शुक्रवारी सांगितलं की Omicron चा सब-व्हेरियंट BA.2 ची प्रकरणं वाढत आहेत. आजकाल ब्रिटनमध्ये कोविड-19 चे बहुतेक प्रकरणं BA.1 व्हेरिएंटची आहेत. ब्रिटीश प्राधिकरणाने अधोरेखित केलं की "व्हायरल जीनोममधील बदलांच्या महत्त्वाबद्दल अद्याप अनिश्चितता आहे," ज्यासाठी निरीक्षण आवश्यक आहे. दरम्यान, अलीकडच्या काळातील प्रकरणांवर नजर टाकल्यास, भारत आणि डेन्मार्कमध्ये विशेषतः BA.2 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

Corona Vaccinationच्या नियमात बदल, मुंबईत आता दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण

कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांपैकी ओमायक्रॉन हा सर्वात धोकादायक मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 26 नोव्हेंबर रोजी 'चिंताजनक' स्वरूप असं वर्णन करून या व्हेरिएंटचं नाव ओमायक्रॉन ठेवलं. 'चिंताजनक रूप' ही WHO ची कोरोना विषाणूच्या अधिक धोकादायक प्रकारांसाठीची सर्वोच्च श्रेणी आहे.

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटलादेखील या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. कोविडचं सर्वाधिक संसर्गजन्य स्वरूप B.1.1.1.529 चे पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून समोर आलं होतं.

First published:

Tags: Corona spread, Corona updates