Home /News /coronavirus-latest-news /

Omicron चं एक नवीन लक्षण समोर, शरीराच्या 'या' भागावर होतो Attack

Omicron चं एक नवीन लक्षण समोर, शरीराच्या 'या' भागावर होतो Attack

omicron

omicron

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये (omicron variant) विविध लक्षणे दिसत आहेत.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी: कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये (omicron variant) विविध लक्षणे दिसत आहेत. ज्यामुळे कोरोना आणि सामान्य फ्लूच्या (common flu symptoms) लक्षणांमधील फरक समजणं कठीण झालं आहे. दरम्यान यूकेने नोंदवलेल्या 20 लक्षणांच्या ओमायक्रॉनच्या यादीमध्ये एक पूर्णपणे नवीन लक्षण दिसून आलं आहे, ज्यावरून ते ओळखलं जाऊ शकतं. Omicron शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करत आहे. हृदय, मेंदू, डोळे याशिवाय आता कानांवरही त्याचा परिणाम होत आहे. नवीन व्हेरिएंटमुळे कान दुखणं, मुंग्या येणं, बेल वाजणं किंवा शिट्टी वाजणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. विशेषत: पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये हे लक्षणं दिसून येत आहे. व्हेरिएंटमुळे प्रभावित झालेल्या लोकांना देखील थंडी वाजणे सारखी लक्षणे जाणवत आहेत. अशा परिस्थितीत वेळीच उपचार केल्यास ही समस्या बऱ्याच अंशी बरी होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. Corona चा नवा व्हेरिएंट?, Omicron च्या BA.2 चा कहर; स्ट्रेनचा तपास सुरु  व्हायरसचा प्रणालीवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कोविडच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कानाच्या अंतर्गत मॉडेलची चाचणी केली. रुग्णांच्या कानात दुखणे, मुंग्या येणे अशी लक्षणे जाणवत असल्याचं त्यांना आढळून आले. जे कदाचित लोकांना हे देखील माहित नसेल की हे कोविडचे लक्षण आहे. डॉ. कॉन्स्टेंटिना स्टॅनकोविक म्हणाल्या की, जर तुम्हाला ऐकू येणे, कानात आवाज येणं किंवा चक्कर येणं अशा समस्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत त्वरित कोविड चाचणी करा. अनेक रुग्णांमध्ये आम्हाला फक्त हियरिंग लॉस हेच कोरोनाचे लक्षण आढळले. कालच्या वक्तव्यावरुन प्रियंका गांधींचा U-turn, म्हणाल्या...''मी तर'' याशिवाय ZOE कोविड लक्षण अभ्यासाचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी सन ऑनलाइनला सांगितलं की, हा व्हेरिएंट नाकाऐवजी तुमच्या आतड्यातही लपलेला असू शकतो. याचा अर्थ असा की जेव्हा लोकांना संसर्ग होतो आणि त्यांना पोटदुखी सारखी लक्षणे दिसतात. तेव्हा त्यांची कोविड चाचणी नकारात्मक येते. कारण नाक किंवा तोंडात ओमायक्रॉनचे कोणतेही ट्रेस नाहीत. ते म्हणाले की, हा व्हायरस शरीराच्या वेगवेगळ्या भागात आढळू शकतो हे आम्हाला माहीत आहे. अशा स्थितीत ओमायक्रॉन आतड्यावरही हल्ला करत असल्याची शक्यता आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Omicron

    पुढील बातम्या