मास्कचा कंटाळा येतो? पण मास्क वापरणाऱ्यांनाच कमी आहे कोरोनाचा धोका, संशोधनात आलं समोर

मास्कचा कंटाळा येतो? पण मास्क वापरणाऱ्यांनाच कमी आहे कोरोनाचा धोका, संशोधनात आलं समोर

सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जगभरात फेस मास्कचा वापर करताना दिसून येत आहेत. मास्कचा वापर केल्याने कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं वारंवार सांगण्यात आले आहे. आता एका नवीन संशोधनात देखील असेच समोर आले आहे.

  • Share this:

कॅनडा, 09 ऑक्टोबर : कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर संशोधन सुरु असून विविध उपाय आणि मार्ग देखील शोधले जात आहेत. यामध्ये सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्ड आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यात येत आहे. सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जगभरात फेस मास्कचा वापर करताना दिसून येत आहेत. मास्कचा वापर  केल्याने कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं वारंवार सांगण्यात आले आहे. आता एका नवीन संशोधनात देखील असेच समोर आले आहे.

कॅनडामधील सायमन फ्रेसर विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. यामध्ये मास्कचा वापर केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याला 25 टक्के कमी होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर व्यवसाय आणि इतर सामाजिक कार्यक्रमांवर घातलेल्या बंदीमुळेदेखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसून येत आहे. या संशोधनात त्यांनी Ontario मधील 34 पब्लिक हेल्थ युनिटचा दोन महिने अभ्यास केला. त्याचबरोबर इतर ठिकाणी मास्कचा वापर उशिरा केला आहे त्या ठिकाणचा आणि या 34 युनिटची तुलना केली. यामध्ये आढळून आलं, मास्क वापरणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. त्याचबरोबर मास्कची सक्ती केल्यामुळं 30 टक्के नागरिकांमध्ये मास्क वापरण्याचं प्रमाण वाढल्याचं निरीक्षण देखील संशोधनात नोंदवण्यात आलं आहे.

(हे वाचा-जवळपास 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, शुक्रवारी वायदे बाजारात दर वधारले)

दरम्यान, या संशोधनाच्या मुख्य संशोधनकर्त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार, सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या निरीक्षणानंतर केवळ मास्कचा वापर कोरोना रोखण्यासाठी प्रभावी आहे की नाही या निर्णयापर्यंत ते पोहोचले नाहीत. पण इतर गोष्टींच्या बंधनांमुळे आणि कायद्यांमुळे यामध्ये नक्कीच घट  होत आहे.

(हे वाचा-कोरोनामुळे गमवावी लागली नोकरी? या सोप्या मार्गांनी करा खर्चाचं नियोजन)

कॅनडामध्ये जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये मास्क वापरण्याची सक्ती नव्हती तेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण अधिक होतं. त्या तुलनेत ती सक्ती केल्यानंतर या रुग्णांच्या संख्येत 25 ते 31 टक्क्यांनी घट झाल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे आम्ही मास्क वापरणार नाही म्हणणाऱ्यांना या संशोधनातून बोध घेता येऊ शकतो त्याचबरोबर मास्क वापरणाऱ्यांनीही अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 9, 2020, 11:33 PM IST

ताज्या बातम्या