जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनातून बरं झालेल्यांना 6 महिन्यांपर्यंत मृत्यूचा अधिक धोका, अभ्यासकांच्या दाव्यानं वाढवली चिंता

कोरोनातून बरं झालेल्यांना 6 महिन्यांपर्यंत मृत्यूचा अधिक धोका, अभ्यासकांच्या दाव्यानं वाढवली चिंता

कोरोनातून बरं झालेल्यांना 6 महिन्यांपर्यंत मृत्यूचा अधिक धोका, अभ्यासकांच्या दाव्यानं वाढवली चिंता

कोरोनातून (Coronavirus) बरे झालेल्या लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग झाल्याचा तपास लागल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका अधिक असतो. यात अगदी त्या लोकांचाही समावेश असू शकतो ज्यांना कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरजही पडली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन 24 एप्रिल : कोरोनातून (Coronavirus) बरे झालेल्या लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग झाल्याचा तपास लागल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका अधिक असतो. यात अगदी त्या लोकांचाही समावेश असू शकतो ज्यांना कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरजही पडली नाही. ही माहिती कोरोनाबद्दल करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्वात व्यापक अभ्यासातून समोर आली आहे. नेचर पत्रिकामध्ये आलेल्या शोधात अभ्यासकांनी सांगितलं, की येत्या काही वर्षांमध्ये या महामारीचा जगाच्या लोकसंख्येवरही मोठा परिणाम होणार आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासकांनी कोरोनाशी संबंधित इतर वेगवेगळ्या आजारांबद्दलची माहितीही दिली आहे. यातून महामारीमुळे होणाऱ्या दिर्घकालीन परिणामाविषयीही कल्पना येते. त्यांनी सांगितलं, की सुरुवातील श्वासनाच्या एका आजाराशी जोडलेला कोरोना दिर्घकाळात शरिरातील सर्वच भागांवर प्रभाव करू शकतो. अजिबात चुकवू नका कोरोनाची लस! पहिल्या डोसनंतर लागण होण्याचा धोका 65% ने कमी या अभ्यासासाठी जवळपास 87000 कोरोना रुग्ण आणि 50 लाख इतर रुग्णांना सामील करण्यात आलं होतं, जे यातून बरे झाले आहेत. याचे वरिष्ठ अभ्यासक आणि मेडिसिनचे सहाय्यक प्रोफेसर जियाद अल अली यांनी सांगितलं, की अभ्यासातून असं समोर आलं आहे, की कोरोना झाल्याचे समजल्यांनंतर सहा महिन्यांच्यानंतरही कोरोनाच्या साधारण प्रकरणांमध्येही मृत्यूची शक्यता कमी नाही आणि ही शक्यता रोगाच्या गंभीरतेसोबत अजूनच वाढत जाते. अल अली म्हणाले, की डॉक्टरांनी त्या रुग्णांची तपासणी करतानाही अधिक दक्षता घेतली पाहिजे जे कोरोनाच्या विळख्यात आलेले आहेत. या रुग्णांना देखरेखीची गरज असते. शोधकर्त्यांनी रुग्णांसोबत केलेल्या बातचीतीच्या आधारे पहिल्या नजरेत समोर आलेली प्रकरणं आणि अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर याचे विविध दुष्परिणाम झाले असल्याचे समोर आले आहे. यात श्वासनास त्रास, हृदयाचे अनियमित ठोके, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि केस गळणं, अशा समस्यांचा समावेश आहे. संशोधनातून असं समोर आलं आहे, की कोरोनातून बरं झाल्यानंतरच्या पहिल्या 30 दिवसांच्या काळानंतर या लोकांमध्ये पुढच्या सहा महिन्यांनंतर मृत्यूची शक्यता सामान्य नागरिकांच्या तुलनेत तब्बल 60 टक्क्यांपर्यंत अधिक असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात