मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'Omicron चा प्रसार वेगाने होऊ द्या'; आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं अजब सल्ल्यामागील कारण

'Omicron चा प्रसार वेगाने होऊ द्या'; आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं अजब सल्ल्यामागील कारण

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

अमेरिकेत राहणार्‍या दोन भारतीय वंशाच्या डॉक्टरांचं मत आहे, की कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) मध्यम ओमायक्रॉन व्हेरिएंटला (Omicron Variant) वेगाने पसरू दिलं पाहिजे

  • Published by:  Kiran Pharate

वॉशिंग्टन 12 जानेवारी : अमेरिकेत राहणार्‍या दोन भारतीय वंशाच्या डॉक्टरांचं मत आहे, की कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) मध्यम ओमायक्रॉन व्हेरिएंटला (Omicron Variant) वेगाने पसरू दिलं पाहिजे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा हा एक सुरक्षित मार्ग ठरू शकतो. मात्र काही तज्ज्ञ हे योग्य मानत नाहीत. या वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणे आहे की अशा धोरणामुळे संसर्गाची प्रकरणे आगीसारखी पसरतील.

मुलांना कोरोना लसीपासून ‘बचावण्यासाठी’ आईनेच केलं अपहरण

भारतीय वंशाचे डॉक्टर विवेक रामास्वामी आणि अप्रुवा रामास्वामी म्हणाले की, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग (Spread of Omicron Variant) कमी करण्यासाठी तयार केलेल्या धोरणाचा विचार करणं आवश्यक आहे. कारण हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे आणि लसीद्वारे तयार केलेल्या अँटीबॉडीजवरही तो परिणाम करतो. म्हणून, जोखीम कमी करण्यासाठी धोरण निर्मात्यांनी सौम्य लक्षणांसह या प्रकाराच्या संसर्गाचा प्रसार करण्यास परवानगी दिली पाहिजे. हे थोडं अवघड असलं तरी भविष्यात अनेकांचे जीव वाचतील.

डॉ. विवेक रामास्वामी रोव्हेंट सायन्सेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अप्रुवा रामास्वामी ओहायो युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे प्राध्यापक आहेत. या दोन्ही आरोग्य तज्ज्ञांनी जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत मत व्यक्त केलं आहे. यावेळी ते म्हणाले, की मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम दूर केले पाहिजेत, कारण यामुळे संसर्ग पसरण्यापासून रोखता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

संसर्गापासून असा करा बचाव; WHO ने निरोगी-ठणठणीत राहण्यासाठी सांगितल्या या टिप्स

परंतु, या दोन्ही डॉक्टरांचं मत इतर तज्ञांनी नाकारलं आहे. हे लोक म्हणाले की, असं करणं म्हणजे जाणूनबुजून ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार करण्यासारखं आहे आणि ही एक धोकादायक तसंच स्फोटक कल्पना आहे. त्याचबरोबर या डॉक्टरांच्या मतालाही बराच विरोध झाला आहे. काही लोकांनी आरोग्य तज्ज्ञांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जगभरातील कोविड-19 प्रोटोकॉल, नियमांची अत्यावश्यकता आणि लॉकडाऊन संदर्भात उचलली जाणारी पावले यादरम्यान आरोग्य तज्ञांनी मांडललेल्या या मतांशी काही लोक सहमत नाहीत.

First published:

Tags: Corona spread, Corona updates