नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : भारतात सध्या कोरोना लशीचे दोन डोस दिले जात आहेत. पण आता लवकरच फक्त एकच डोस घ्यावा लागणार आहे. सिंगल डोस (Single dose) कोरोना लस स्पुतनिक लाइटला (Sputnik Light) मोदी सरकारने हिरवा कंदील दिला आहे. भारतात या या लशीचं ट्रायल होणार आहे. या लशीचा एकच डोस पुरेसा आहे. भारतात सध्या रशियाच्या स्तुपनिक V कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरला मंजुरी देण्यात आलेली आहे. स्पुतनिक लाइट ही स्पुतनिक V चं पुढील व्हर्जन आहे, अशी माहिती याआधी रशियाने दिली होती. भारतात रशियन लस देण्यासाठी हैदराबादमधील डॉ. रेड्डी (Dr. Reddy’s) कंपनीने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडसोबत (Russian Direct Investment Fund) करार केलेला आहे. स्तुपनिक V नंतर स्पुतनिक लाइटलाही भारतात मंजुरी मिळवण्यासाठी या कंपनीने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC) या लशीच्या ट्रायलला मंजुरी देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने या लशीच्या ट्रायलला मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता या लशीचं भारतात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल होणार आहे. Explainer - दोन डोसनंतर तिसरा डोस; कोरोनाचा Booster dose फायद्याचा ठरेल? जुलैमध्ये या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागण्यात आली होती. पण केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन, CDSCO) तज्ज्ञ समितीने ही मागणी नाकारली होती. भारतात या लशीचं ट्रायल झालं नाही, त्यामुळे याला परवानगी नाही देऊ शकत असं समितीने सांगितलं होतं. आता या लशीच्या ट्रायलला परवानगी मिळाली आहे. मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. रॉयटर्स च्या वृत्तानुसार RDIF सांगितलं, सिंगल डोस स्पुतनिक लाइटचं 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान लसीकरण मोहिमेत ही लस वापरण्यात आली. लस दिल्यानंतर 28 दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस 79.4% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आलं आहे. यात 7,000 लोकांचा समावेश होता. भारताने 13 दिवसांत दिले तब्बल 10 कोटी डोस, WHO ने केलं कौतुक ही लस कोरोनाविरोधात 79.4% प्रभावी आहे. काही लशींच्या दोन डोसपेक्षाही प्रभावी या लशीचा एक डोस आहे, असं रशियाने सांगितलं. या लशीच्या एका डोसशी किंमत 10 डॉलर्स म्हणजे 737 रुपयांपेक्षाही कमी आहे. या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली तर कोरोनाविरोधी लढ्यात ही लस महत्त्वाची ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.