नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : भारतात कोरोना प्रतिबंधक लस (
Corona Dose) देण्याचा वेग कमालीचा वाढला असून गेल्या 13 दिवसांत (
13 days) तब्बल 10 कोटींपेक्षा अधिक नागरिकांच लसीकरण (
10 crore doses) करण्यात आलं आहे. जगात नोंदवला गेलेला हा एक अनोखा विक्रम असून जागतिक आरोग्य संघटनेनं याबद्दल भारतानं कौतुक केलं आहे.
कोट्यवधींच्या लसीकरणाचा विक्रम
भारतानं आतापर्यंत 75 कोटी डोस टोचण्याचा विक्रम नोंदवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी याची माहिती दिली. लसीकरण मोहिमेतील या प्रचंड वेगाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं भारतानं अभिनंदन केलं आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजेच 75 व्या वर्षात 75 कोटी लसीकरणाचा टप्पा भारताने पार केला आहे.
WHO कडून कौतुक
आतापर्यंत 75 कोटी नागरिकांना लस देऊन आणि गेल्या 13 दिवसांत 10 कोटी लसी देऊन भारतानं नोंदवलेल्या विक्रमाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं भारताचं कौतुक केलं आहे. भारताला पहिले 10 कोटी डोस देण्यासाठी 85 दिवस लागले होते. मात्र 65 कोटी डोस ते 75 की डोस हा टप्पा भारताने केवळ 13 दिवसांत पूर्ण केल्याचं निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेनं नोंदवलं आहे.
हे वाचा -
हनिमूनसाठी गेलं होतं दाम्पत्य, पतीमुळे पुरती फजिती; बिचारी पत्नी एकटीच परतली घरी
लसीकरणाचा वेग वाढला
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारताला पहिले 10 कोटी डोस देण्यासाठी 85 दिवस लागले होते. 20 कोटी डोस देण्यासाठी 45 दिवस, 30 कोटी आणि 40 कोटी लसी देण्यासाठी प्रत्येकी 24 दिवस लागले होते. त्यानंतर 50 कोटींचा आकडा पार करण्यासाठी 20 दिवस, 60 कोटींसाठी 19 दिवस, तर 60 ते 75 कोटींचा आकडा पार करण्यासाठी केवळ 13 दिवस लागले. 7 सप्टेंबरला भारतानं हा ऐतिहासिक टप्पा पार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.