कोरोना काळात आई-बाबा झाल्यास या देशाचे सरकार देणार बोनस, आर्थिक मदतीची घोषणा

कोरोना काळात आई-बाबा झाल्यास या देशाचे सरकार देणार बोनस, आर्थिक मदतीची घोषणा

या देशातील नागरिक जर कोरोना काळात आई-वडील होणार असतील तर सरकारकडून एकरकमी बोनस (one-time payment) देण्यात येणार आहे

  • Share this:

सिंगापूर, 08 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरातील अनेकजण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी प्रत्येक देशाच्या सरकारकडून विविध पॅकेज जाहीर करण्यात येत आहेत. विविध योजना जाहीर करून आर्थिक साहाय्य केले जात आहे. अशातच एका देशाने नागरिकांसाठी एक अनोखी मदत जाहीर केली आहे. या देशातील नागरिक जर कोरोना काळात आई-वडील होणार असतील तर सरकारकडून एकरकमी बोनस (one-time payment) देण्यात येणार आहे. कारण कोरोनाच्या काळात आर्थिक संकटामुळे अनेक दाम्पत्यांनी आई-वडील बनण्याचे टाळले होते.

सिंगापूरमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. याठिकाणच्या उपपंतप्रधानांनी असे म्हटले आहे की, या मदतीमुळे लोकांवरील आर्थिक दबाव कमी होईल आणि जॉबची चिंता असणाऱ्यांना देखील मदत होईल. सीएनएन बिझनेसने याबाबत वृत्त दिले आहे. सिंगापूरचे उपपंतप्रधान  Heng Swee Keat असे म्हणाले आहेत की, 'कोरोनामुळे आई-बाबा होऊ इच्छिणाऱ्या अनेकांनी त्यांच्या पालकत्वाची योजना पुढे ढकलल्याचे आमच्या लक्षात आले आहे. सध्या उत्पन्नामध्ये अनिश्चितता असल्यामुळे हे समजण्यासारखे आहे.'

(हे वाचा-Gold Rate Today- आज सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ, इथे वाचा गुरुवारचे नवे दर)

दरम्यान याबाबत सिंगापूरचे उपपंतप्रधान हेंग स्वी कीट यांनी पालकांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे पण सरकारकडून किती मदत केली जाईल, याबाबत त्यांनी माहिती दिली नाही आहे.

(हे वाचा-रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, उपयोगाची आहे LIC ची ही योजना)

कोरोना व्हायरसमुळे इतर देशांप्रमाणेच सिंगापूरची अर्थव्यवस्था देखील ढासळली आहे. सिंगापूरमध्ये जगातील सर्वात कमी जन्मदर आहे. सिंगापूरमधील सरकारांनी ही आकडेवारी बदलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. सिंगापूरच्या नॅशनल स्टॅटिस्टिक बॉडीनुसार आता याठिकाणी प्रजनन दर 1.14 बर्थ प्रति महिला इतका आहे. हाँगकाँग देखील याच पातळीवर आहे. केवळ दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या Puerto Rico मध्ये याहीपेक्षा जन्मदर कमी आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 8, 2020, 10:31 PM IST

ताज्या बातम्या