रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, वाचा कशी उपयोगाची आहे LIC ची ही योजना

रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, वाचा कशी उपयोगाची आहे LIC ची ही योजना

कमी कमाई असणाऱ्या लोकांसाठी LIC ची मायक्रो बचत विमा योजना (Micro Bachat Insurance Policy) फायद्याची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : कमी कमाई असणाऱ्या लोकांसाठी LIC ची मायक्रो बचत विमा योजना (Micro Bachat Insurance Policy) फायद्याची आहे. ज्या लोकांची कमाई कमी आहे, त्यांच्यासाठी एलआयसीचा मायक्रो इंश्योरेंस प्लान (Micro Insurance Plan) फायदेशीर आहे. ही योजना प्रोटेक्शन आणि बचत दोन्ही फायदे देऊ करतो. हा प्लॅनची पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देखील  होऊ शकते. त्याचप्रमाणे पॉलिसी मॅच्यूअर झाल्यानंतर एकरकमी रक्कम तुमच्या हाती येईल.

1. कर्जाची सुविधा

मायक्रो सेव्हिंग नावाच्या या नियमित प्रीमियम योजनेत बरीच वैशिष्ट्ये आहेत. या विमा योजनेत 50 हजार ते 2 लाखांचा विमा उपलब्ध असेल. ही नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. या योजनेंतर्गत लॉयल्टीचा फायदा मिळेल. जर एखाद्याने 3 वर्षांसाठी प्रीमियम दिला असेल तर त्याला मायक्रो सेव्हिंग्ज प्लॅनमध्ये कर्जाची सुविधा देखील मिळेल.य

2. वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही

हा विमा केवळ 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांना उपलब्ध असेल. या अंतर्गत कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता राहणार नाही. जर कोणी 3 वर्ष सातत्याने प्रीमियम भरला आणि त्यानंतर त्याला प्रीमियम भरता आला नाही तरी 6 महिन्यापर्यंत विम्याची सुविधा सुरू राहील. हा प्रीमियम पॉलिसीधारकावे 5 वर्षांपर्यंत भरला तर त्याला 2 वर्षांचे ऑटो कव्हर मिळेल. या योजनेची संख्या 851 आहे.

3. अ‍ॅक्सिडेंटल राइडरची सुविधा

मायक्रो बचत विमा योजनेची पॉलिसीची टर्म 10 ते 15 वर्षे असेल. या योजनेत प्रीमियम वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही आणि मासिक तत्वावर भरता येईल.  यामध्ये एलआयसीमध्ये अ‍ॅक्सिडेंटल राइडर जोडण्याची सुविधा देखील मिळेल. पण यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र प्रीमियम भरावा लागेल.

4. दिवसाला 28 रुपयात मिळेल 2 लाखांचा विमा

याअंतर्गत 18 वर्षांची व्यक्ती जर 15 वर्षाची योजना घेत असेल तर त्याला प्रति हजार 51.5 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्याचवेळी, 25 वर्षांच्या व्यक्तीला त्याच कालावधीसाठी 51.60 रुपये आणि 35 वर्षांच्या व्यक्तीला प्रति हजार 52.20 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 10 वर्षांच्या योजनेतील प्रीमियम 85.45 ते 91.9 रुपये प्रति हजार असेल. प्रीमियममध्ये 2 टक्के सूटदेखील असेल. जर आपल्याला खरेदी केल्यानंतर हा विमा आवडत नसेल तर आपण 15 दिवसांच्या आत योजना सरेंडर करू शकता. जर 35 वर्षांची व्यक्ती 1 लाख रुपयांच्या सम अश्योर्डची 15 वर्षाची पॉलिसी घेत असेल तर त्याचे वार्षिक प्रीमियम 5116 रुपये होईल. सध्याच्या पॉलिसीमध्ये 70 टक्के पर्यंत कर्ज उपलब्ध असेल त्याच वेळी, पेड पॉलिसीमध्ये 60 टक्के रक्कम कर्जासाठी पात्र असेल.

5. असे आहे गणित

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 35 व्या वर्षी पुढील 15 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली असेल, तर त्याला वर्षाकाठी 52.20 रुपये (1 हजार रुपये विम्याच्या रकमेवर) प्रीमियम भरावा लागेल. त्याचप्रमाणे, एखाद्याने विम्याची रक्कम 2 लाख रुपये घेतल्यास त्याला 52.20 x 100 x 2 म्हणजेच 10,300 रुपये वार्षिक जमा करावे लागतात. म्हणजेच तुम्हाला दररोज 28 रुपये आणि दरमहा 840 रुपये प्रीमियम भरावा लागतो.

6. कलम 80 सी अंतर्गत प्रीमियम पेमेंटवर सूट

या पॉलिसीचे मॅच्युरिटीचे कमाल वय 70 वर्षे असेल. ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रीमियम पेमेंटवर कलम 80 सी अंतर्गत आयकरात सूट मिळेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 8, 2020, 9:57 AM IST
Tags: money

ताज्या बातम्या