भोपाळ, 9 एप्रिल: देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या परिस्थितीत प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्यास वांरवार सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी काही नागरिक मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे पहायला मिळत आहे. आता असाच एक प्रकार मध्यप्रदेशा (Madhya Pradesh)तील भोपाळ (Bhopal)मधून समोर आला आहे. येथे आरोग्य कर्मचाऱ्या (Health Worker)ने उसाचा रस (Sugarcane juice) पिण्यासाठी चक्क कोरोना बाधिताला घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच (Covid 19 patient ambulance) थांबवली. ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल (Video goes viral in social media) होत आहे.
ही घटना भोपाळमधील राजेंद्र टॉकीज चौकाजवळ घडली आहे. एका कोरोना बाधित रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका भररस्त्यात अचानक थांबवण्यात आली. या रुग्णवाहिकेतून पीपीई किट घातलेला आरोग्य कर्मचारी बाहेर पडला आणि रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या ज्यूस सेंटरजवळ पोहोचला. यानंतर त्याने आपल्यासाठी उसाच्या रसाची ऑर्डर दिली.
हे पण वाचा : फक्त एक डोस पुरेसा; Johnson & Johnson ची कोरोना लस आता भारतात
हा आरोग्य कर्मचारी उसाचा रस पिण्यासाठी थांबला होता. तर त्याचे सहकारी आणि कोरोना बाधित रुग्ण हे रुग्णवाहिकेत त्याची वाट पाहत थांबले होते. हे सर्व दृष्य पाहून स्थानिक नागरिकही चक्रावले. यावेळी एका स्थानिक नागरिकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आणि या आरोग्य कर्मचाऱ्याला याबद्दल विचारले. यावेळी आरोग्य कर्मचारी म्हणाला, कोरोना बाधित रुग्ण हा रुग्णवाहिकेत आहे मला कोरोना झालेला नाहीये.
हे पण वाचा : Weekend Lockdown वाढू शकतो; आठवडाभर असू शकतील कडक निर्बंध, उद्याच्या बैठकीत ठरणार फायनल
कोरोना बाधित रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका ज्यूस पिण्यासाठी थांबवण्यात आल्याने तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती होती. अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे सर्वच स्तरातून टीका होत आहे.
या प्रकरणी सीएमएचओने सांगितले की, अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. डॉक्टर म्हणाले की, मी या घटनेचा व्हिडिओ पाहिलेला नाहीये, आता या प्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Madhya pradesh