नवी दिल्ली, 21 जून : सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी (coronavirus) लढतं आहे. कोरोनाव्हायरसवरील उपचार, त्याविरोधातील लस आणि औषधं शोधण्यात जुटलं आहे. मात्र कोरोना ही शेवटची महासाथ नाही तर यापुढे अनेक आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तयार राहावं लागेल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. Soumya Swaminathan) यांनी सावध केलं आहे.
न्यूज 18 ने डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या या परिस्थिती इतर आजारांकडे होणारं दुर्लक्ष, अत्यावश्यक आरोग्य सेवांवर होणारं परिणाम आणि त्याचे भविष्यात होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष वेधलं आहे, त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं, "आम्ही 80 देशांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी निम्म्या देशांनी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची योजना होती. त्यांनी अत्यावश्यक सेवांची यादी तयार केली होती. फक्त 35 टक्के देशांनी यासाठी संसाधने ठेवली होती"
हे वाचा - 103 रुपयांच्या औषधानं करू शकता कोरोनावर मात, 'या' गोळीनं बरा होणार रुग्ण
"कोरोनाच्या परिस्थितीत ज्या सेवांवर परिणाम होतो आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आहे ते लहान मुलांचं लसीकरण. जवळपास 80% देशांमधील लसीकरण अंशतः किंवा पूर्णपणे ठप्प झालं आहे. हे खूप गंभीर आहे. त्यामुळे गोवरसारख्या आजारांचा उद्रेक होताना आपल्याला दिसेल जो मोठ्या झपाट्याने पसरतो", अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, "भारत आणि इतर देशांमध्येही टीबीची प्रकरणं 80 टक्क्यांनी घेतली आहेत कारण लोकं चाचणीसाठी क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. हृदयासंबंधी आजार, स्ट्रोक, टीबी अशा रुग्णांना त्यांना गरज असलेल्या सेवा वेळेत मिळत नाही आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांव्यतिरिक्त इतर आजारामुळे लोकांचा मृत्यू होणं हेदखील आपण पाहू शकत नाही"
हे वाचा - चिंताजनक! लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांना कमजोर बनवतोय कोरोनाव्हायरस
लॉकडाऊन आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा कमी होणं याचा दीर्घकालीन परिणाम होईल. कोरोनाची महासाथ म्हणजे आव्हानांसह एक संधीही असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ. सौम्या म्हणाल्या, "कोरोनासारख्या महासाथीने आव्हानांसह संधीही दिली आहे. आपली आरोग्य प्रणाली मजबूत करण्याची संधी. ज्यामुळे आपण या महासाथीतून आपोआप बाहेर येऊ आणि पुढील महासाथीपासूनही बचाव करू. असे व्हायरल आजार पुन्हा पुन्हा येत राहतील यात शंका नाहीच. आपण पाहत असलेलो ही शेवटची महासाथ नाही"
जेव्हा देश सामान्य परिस्थिती येतील तेव्हा लसीकरण, माता आणि बालकांसाठी आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य, कॅन्सरसारखे असंसर्गजन्य आजार इत्यादी अत्यावश्यक आरोग्य सेवांकडे तातडीने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यासाठी एक योजनाबद्ध कार्यक्रम आणि गुंतवणुकीची गरज असल्याचं डॉ. स्वामिनाथन यांनी सांगतिलं.
संकलन, ंसंपादन - प्रिया लाड
हे वाचा - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी योग महत्त्वाचा- मोदी मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.