मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आता वर्षभर प्रतीक्षा करण्याची गरज नाही; अवघ्या काही मिनिटांतच तयार होणार कोरोना लस

आता वर्षभर प्रतीक्षा करण्याची गरज नाही; अवघ्या काही मिनिटांतच तयार होणार कोरोना लस

corona vacccine

corona vacccine

शास्त्रज्ञांनी असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे ज्यामुळे कोरोना लस (corona vaccine) निर्मितीला वेग मिळेल.

कॅलिफोर्निया, 10 फेब्रुवारी :  कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) सध्या लस (corona vaccine) उपलब्ध झाली आहे पण यासाठी तब्बल वर्षभर प्रतीक्षा करावी लागली. त्यात आता कोरोना आपली रुपं सातत्यानं (coronavirus mutation) बदलतो आहे. काही कोरोना लशी या नव्या रुपांविरोधात प्रभावी ठरत असल्याचं सांगितलं जातं आहे. पण तरी जर प्रत्यक्षात तसं झालं नाही तर मग पुन्हा या नव्या स्ट्रेनवर लस तयार होण्यासाठी पुन्हा किमान वर्षभराची प्रतीक्षा. पण आता याची चिंताही करण्याची गरज नाही कारण शास्त्रज्ञांनी यावर मार्ग शोधला आहे. कोरोनाचा स्ट्रेन बदलल्याने म्युटेशनच्या होणाऱ्या परिणामांचा प्रतिकार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन पद्ध तयार केली असून, यामुळे लस विकास प्रक्रियेला गती येण्यास मदत होणार आहे. याबाबत युनिर्व्हसिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या (Unversity Of Southern California) संशोधकांचा पेपर नेचर सायंटिफीक जर्नलमध्ये प्रसिद्द करण्यात आला आहे. यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचे तीन नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळे लसीकरण आराखडा प्रक्रियेला तातडीने वेग देण्याची गरज विज्ञान क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञांनी डिपव्हॅकप्रिड (DeepVacPred) हे डिझाईन तयार केलं आहे.  सिलिको इम्युनोइन्फरमॅटिक्स आणि डीएनएन तंत्रज्ञानाच्या मदतीने नोव्हेल कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Novel AI) आधारित सिलिको मल्टिपिटॉप लस डिझाईन फ्रेमवर्क तयार करण्यात आलं आहे. झिकून यांग, पॉल बोगदान आणि शाहिन नाझरियन यांच्या मार्गदर्शनखाली सुरु असलेल्या अभ्यासात हे AI फ्रेमवर्क डिप न्युरल नेटवर्क (डीएनएन) लशीची रचना आणि त्यानंतरच्या क्लिनिकल चाचण्यांमधील आवश्यक वेळ कमी करण्यात कशी मदत करू शकतं, हे या पेपरमध्ये स्पष्ट केलं आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोना लस घेतली आणि तडफडत जमिनीवर कोसळला; 25 मिनिटांतच गेला जीव लशीतील गुंतागुंत समजून घेत त्यावर उपचार करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI Model) मदत कशी घेता येईल, याबाबत संशोधकांनी या अहवालात चर्चा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या मॉडेलमुळे लस डिझाईनचा वेग वाढण्यास मदत होणार असून, ज्या कामासाठी महिने किंवा वर्षे लागतात, तेच काम आता काही मिनिटांत होऊ शकेल, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. शास्त्रज्ञांनी एआय (AI) मॉडेलद्वारे नमुने तपासणीसाठी प्रथम संसर्गजन्य आणि रोगप्रतिकारक रोगांशी निगडित सार्वजनिक डेटा विचारात घेतला. त्यांनी सार्स-कोव्ह-2 जीनोम आणि स्पाईक प्रोटिन सिक्वेन्सची नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्निकलकडून माहिती घेतली. त्यानंतर डिपव्हॅकप्रिड या मॉडेलच्या आधारे 95 टक्के संयुगं वेगळी करण्यात आली आणि त्यातून लशीसाठी पूरक आणि आवश्यक संयुगे निवडण्यात त्यांना यश आलं. केवळ काही सेकंदात एआय मॉडेलच्या आधारे सार्स- कोव्ह-2 च्या विरोधात कार्य करणाऱ्या 26 संभाव्य घटक सुचवण्यात त्यांना यश मिळालं. कोरोना विषाणूला पोषक ठरणाऱ्या प्रोटिन्सवर हल्ला करणाऱ्या मल्टीपिटोप व्हॅक्सिन तयार करण्यासाठी आवश्यक 11 संयुगांची यादी तयार करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरले. हे वाचा - धक्कादायक माहिती : लस घेतल्यानंतरही अमरावती जिल्ह्यात 19 जणांना कोरोनाची लागण कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिपव्हॅकप्रिड वापरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यापीठ आणि संशोधकांच्या मते हे तंत्र एक मिनिटापेक्षा कमी वेळात नवीन मल्टीपिटोप व्हॅक्सिन तयार करण्यासाठी सक्षम असेल, एक तासाच्या आत त्याची गुणवत्ता निश्चित करता येईल, या प्रक्रियेस किमान एक वर्ष लागत होते. या कालावधीत विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. विषाणूंचं वैशिष्ट्य जाणून घेऊ शकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फ्रेमवर्कमुळे काही सेकंदातच लस गरजूंना मिळू शकते. तसंच सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपचार साध्य करण्यासाठी त्वरित क्लिनिकल चाचण्या देखील करता येऊ शकतात, असं यूएसी विटर्बी येथील इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक पॉल बोगदान यांनी सांगितलं.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, South africa, Uk, USA, World After Corona

पुढील बातम्या