Home /News /coronavirus-latest-news /

Omicron आटोक्यात आणण्यासाठी भारतात लॉकडाऊन गरजेचं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Omicron आटोक्यात आणण्यासाठी भारतात लॉकडाऊन गरजेचं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

व्हायरसच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown in India) हा एकमेव मार्ग आहे का? की सरकारने तिसऱ्या डोसचाही (Third Dose of Vaccine) विचार करायला सुरुवात करावी?

    नवी दिल्ली 07 डिसेंबर : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron Variant of Coronavirus) या नवीन प्रकाराने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे. नवीन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत तीनपट जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत व्हायरसच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown in India) हा एकमेव मार्ग आहे का? की सरकारने तिसऱ्या डोसचाही (Third Dose of Vaccine) विचार करायला सुरुवात करावी? या प्रश्नांचं तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर जाणून घेऊ. संसर्गजन्य रोगतज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की लस निश्चितपणे कोणत्याही प्रकारापासून संरक्षण प्रदान करते. म्हणजेच, लसीकरण केलेली व्यक्ती लसीकरण न केलेल्या व्यक्तीपेक्षा सुरक्षित असते. परंतु संपूर्ण सुरक्षिततेसाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांनी फक्त एकच डोस घेतला आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर दुसरा डोस घ्या. देशात अजूनही 15 टक्के प्रौढ आहेत ज्यांनी कोणताही डोस घेतला नाही. अशा परिस्थितीत लोकांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. बूस्टर डोसवर म्हणजेच तिसऱ्या डोसवर डॉ. लहरिया म्हणाले, की सर्वात आधी एकही लस न घेतलेल्या व्यक्तींचं लसीकरण करणं गरजेचं आहे. बाकी बूस्टर डोसबद्दल शास्त्रज्ञ आणि टेक्निल एक्सपर्ट बोलत आहेत. मागील डेल्टा व्हेरिएंटपेक्षा नवीन व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ओमिक्रॉन लसीकरण केलेल्या लोकांवरही परिणाम करत आहे. अशा स्थितीत लग्नसराई, पार्टी आणि बाजारपेठेतील वाढती गर्दी लोकांना पुन्हा एकदा विनाशाच्या वाटेवर घेऊन जात आहे. व्हायरोलॉजिस्ट डॉ. दीपक आचार्य याविषयी म्हणाले, 'ओमिक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. लोकांनी स्वतः सावध राहणे अधिक महत्त्वाचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका. लॉकडाऊनपेक्षाही सेल्फ रिस्ट्रिक्शन या व्हायरसपासून तुमचा बचाव करतील. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी याबाबत सांगितले की, 'कोरोनाचे नवीन प्रकार समोर आल्याने लोकांना घाबरण्याची गरज नाही. याची नवीन प्रकरणं समोर येणं ही भारतासाठी चांगली बाब आहे. यामुळे आपण त्याचा समाजात प्रसार होण्यापासून रोखू शकतो. हा धोका टाळण्यासाठी चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावा. बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही डबल मास्क घालू शकता. याशिवाय ज्या लोकांनी लसीचा डोस घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. डॉ.राहुल म्हणाले की, आरोग्यासोबतच आपलं अर्थचक्रही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही देशात फ्लाइट किंवा कॅबने प्रवास करू शकता, पण त्यादरम्यान तुमची सामाजिक जबाबदारी लक्षात ठेवा. जर तुम्ही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर त्याची त्वरित तपासणी करा. जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर स्वतःला क्वारंटाइन करण्यात अजिबात उशीर करू नका. ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली तर लॉकडाऊन किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाची गरज भासणार नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona virus in india, Lockdown

    पुढील बातम्या