Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाग्रस्ताच्या विष्ठेमार्फत Coronavirus पसरण्याचा धोका आहे का?

कोरोनाग्रस्ताच्या विष्ठेमार्फत Coronavirus पसरण्याचा धोका आहे का?

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या विष्ठेत व्हायरस सापडले आहेत, त्यामुळे शौचामार्फत कोरोनाव्हायरस (coronavirus infection through faeces) पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) हा खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर संक्रमित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीचं तोंड, नाक आणि डोळ्यांतून शरीरात प्रवेश करतो. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्या व्यक्तीने आपल्या व्हायरसयुक्त हातांनी स्पर्श केलेल्या वस्तूला आपण स्पर्श केल्यानंतर कोरोनाव्हायरसचा प्रसार होत जातो. त्यात आता असा प्रश्न पडतो आहे, की कोरोना रुग्णाच्या शौचामार्फत  (infection through faeces) कोरोनाव्हायरस पसरतो का? आणि कोरोना रुग्णाने वापरलेलं टॉयलेट (toilet) इतरांनी वापरल्यानंतर त्यांनाही कोरोनाव्हायरसचा धोका आहे का? कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शौचात व्हायरस सापडलेला आहे, त्यामुळे शौचामार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याबाबत झालेले वेगवेगळे संशोधन लाइव्ह सायन्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेत. कोरोना रुग्णाच्या मलात व्हायरस चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननेही (Chinese Center for Disease Control and Prevention - China CDC) याबाबत अभ्यास केला. कोरोना रुग्णांच्या मलाचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमार्फत अभ्यास करण्यात आला. यामध्ये व्हायरसची संख्या भरपूर होती. यावेळी संशोधकांनी जर नीट फ्लश केलं नाही आणि हात स्वच्छ धुतले नाहीत तर शौचामार्फत कोरोनाव्हायरस पसरू शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती हे वाचा - पाण्यामार्फतही पसरू शकतो coronavirus; काय सांगतात तज्ज्ञ? यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनला दिसून आलं की काही कोरोना रुग्णांच्या शौचातही व्हायरस होता. मात्र मलामध्ये इतक्या प्रमाणात व्हायरस असतो का, की ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्याची लागण होऊ शकते, याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही. तसंच सार्स आणि मर्स व्हायरसचा विचार करता हा व्हायरससही शौचामार्फत पसरत नसावा, असंही त्यांनी मानलं आहे. इमर्जिंग मायक्रोब्स अँड इन्फेक्शन (Emerging Microbes and Infections) मध्ये आलेल्या एका अभ्यासानुसार कोरोना रुग्णाच्या मलात आणि रक्तात मोठ्या प्रमाणात व्हायरस आहेत. टॉयलेटमार्फत पसरू शकतात व्हायरस अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलने 2013 साली केलेल्या एका अभ्यासानुसार टॉयलेटचं झाकण न लावता फ्लश केल्याने अनेक बॅक्टेरिया, व्हायरसच्या संसर्गाचा धोका असतो. पाण्याच्या थेंबामार्फत व्हायरस आपल्या शरीरावर आणि बाथरूममध्ये पसरतात, यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. अशाच जर एखाद्या संक्रमित व्यक्तीने आणि निरोगी व्यक्तीने एकच टॉयलेट वापरला तर त्यामुळे आजारपणाचा धोका आहे. खबरदारी घेणं हाच बचावाचा मार्ग भारताच्या आरोग्य मंत्रालयाने शौचामार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका खूप कमी असल्याचं म्हटलं आहे. मात्र कोरोनाव्हायरसच्या प्रकरणातही काही रुग्णांच्या शौचात व्हायरस मिळालेत, मग अशावेळी कोरोना रुग्ण आणि त्यानंतर इतर व्यक्तींनी टॉयलेट वापरल्यानंतर फ्लश केल्यानंतर झाकण बंद करणं आणि शौचानंतर हात स्वच्छ धुणे हा व्हायरसपासून बचावाचा मार्ग आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - Coronavirus चा स्रोत समजल्या जाणाऱ्या वटवाघळाची या गावात केली जाते पूजा
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या