राज्यात सर्वात आधी कोरोनाने कुठे थैमान घातलं असेल ते मुंबई, पुण्यात. पण या दोन्ही शहरांनी कोरोनाशी चांगलाच लढा दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला थोपवलंच पण आता दुसऱ्या लाटेवरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे.
2/ 9
मुंबई, पुण्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले आणि दाटीवाटीचा परिसर असलेल्या भागात आज एकही नवा कोरोना रुग्ण सापडला नाही आहे. इथं शून्य नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
3/ 9
कोविड 19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात तेथे एकही रुग्ण सापडला नाही.
4/ 9
धारावीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही.
5/ 9
याआधी एक दिवस हा आकडा दोन वर होता. सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 861 इतकी आहे.
6/ 9
एकीकडे मुंबईतील धारावी कोरोना मुक्त होत असतानाच इकडे पुण्यातील भवानी पेठदेखील पहिल्यांदाच कोरोना मुक्त झाली आहे. आज इथं एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही.
7/ 9
विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण 9 मार्च 2020 रोजी आढळून आल्यानंतर राज्यातला पुणेअंतर्गत भवानी पेठ हा पहिलाच कोरोना हॉटस्पॉट म्हणून समोर आला होता.
8/ 9
पहिल्या लाटेत भवानी पेठेतील कोरोनाची साथ आटोक्यात आणायला तब्बल सहा महिने लागले होते. त्यानंतर ढोलेपाटील रोड, बिबवेवाडी, हडपसर, येरवडा, सिंहगड रोड असे एका पाठोपाठ नवनवे हॉटस्पॉट वाढतच गेले.
9/ 9
दुसऱ्या लाटेत मात्र पहिल्यापासून भवानी पेठ या पूर्वीश्रमीच्या हॉटस्पॉटमध्ये कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात होता आणि आज तर थेट तिथं चक्क शून्य रूग्णवाढ नोंदवली गेली आहे.